शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांची वृद्धाला मारहाण

By admin | Updated: September 14, 2015 01:34 IST

जंगलात गुरे चारायला नेले या कारणावरून वनकर्मचाऱ्यांनी अरततोंडी/दाभना येथील एका वृद्ध इसमाला जबर मारहाण केली.

अर्जुनी मोरगाव : जंगलात गुरे चारायला नेले या कारणावरून वनकर्मचाऱ्यांनी अरततोंडी/दाभना येथील एका वृद्ध इसमाला जबर मारहाण केली. ही घटना स्थानिक बांबू आगार येथे घडली. वृद्धाच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी दोन वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार अरततोंडी/दाभना येथील गुलाब लक्ष्मण खोटेले (७०) हा इसम आपल्या घरातील गुरे जंगलात चराईसाठी घेऊन गेला होता. वनक्षेत्र सहायक काशीराम उकाजी मानकर यांनी त्याला बोलावले. ही जागा गुरे चराईसाठी आहे का, असे म्हणून त्या वृद्ध इसमाला काठी व थापड-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. याचवेळी वनरक्षक सुरेश रघुनाथ बडोले यांनी त्याला बोलावले व मारहाण केली. यात गुलाबला जबर दुखापत झाली. मार असह्य झाल्याने गावातील काही इसमांना घडलेला प्रकार कथन केला. शुक्रवारी (११) गावातील काही इसमांना घेऊन गुलाब वन कार्यालयात गेला. त्याने आपबीती वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांना सांगितली. शेवटी याची पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदविण्यात आली. तोंडी तक्रार व वैद्यकीय अभिप्रायावरून पोलीसांनी काशीराम उकाजी मानकर (४७) वनक्षेत्र सहायक व सुरेश रघुनाघ बडोले (४७) यांचेविरूद्ध भादंविची कलम ३२४,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. वृद्धाच्या गुप्तांगावर दुखापत असून त्याला सिटी स्कॅन करण्यासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)