शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कालीमाटीवासीयांना अन्न-पाणी झाले कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

गावातील तरुण चार मुले नदीत वाहून गेली व उशिरापर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघ्या गावातच शोककळा पसरली होती. आता माहिती मिळणार हीच धाकधूक मनात ठेवून कालीमाटीवासी व वाहून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय टक लावून बसले होते. सणाचा दिवस दु:खात बदलला व घराघरांत शिजलेले अन्न कुणाच्याही पोटात गेले नाही. दिवसभर जो-तो या घटनेवर दु:ख व्यक्त करीत होता.

राजीव फुंडेलोकमत न्यूज नेटवर्ककालीमाटी :  मारबत हालकण्यासाठी गेलेली गावातील चार मुले नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने गावातील घराघरांत शोककळा पसरली. माहिती मिळताच गावकरी नदीच्या दिशेने पळाले. उशिरापर्यंत त्या मुलांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघे गाव दु:खात लोटले. गावातील तरुण मुले वाहून गेल्याच्या घटनेमुळे मारबतचा उत्साह विरून गेला व कालीमाटीवासीयांना अन्न-पाणी कडू झाले. आमगाव तालुक्यातील कालीमाटी हे गाव तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. विविध जाती-धर्माचे लोक या गावात गुण्या-गाेविंदाने राहतात. सण, उत्सव, मेळावे, समाजातील चालीरीती व परंपरा एकोप्याने साजरी करतात. तान्हा पाेळ्याचा दिवस मारबत म्हणून साजरा करताना गावातील शेकडो मुले ‘घेऊन जागे मारबतचा’ जल्लाेष करीत घरातून गावातील शिवारावर गेली. परंतु, नदीत घडलेल्या घटनेमुळे दहशत घेऊन काही मुले घरी परतली, तर काही लोक नदीकाठावर राहून मदतीची याचना करीत होते. गावातील तरुण चार मुले नदीत वाहून गेली व उशिरापर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघ्या गावातच शोककळा पसरली होती. आता माहिती मिळणार हीच धाकधूक मनात ठेवून कालीमाटीवासी व वाहून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय टक लावून बसले होते. सणाचा दिवस दु:खात बदलला व घराघरांत शिजलेले अन्न कुणाच्याही पोटात गेले नाही. दिवसभर जो-तो या घटनेवर दु:ख व्यक्त करीत होता. नदीत अंघोळ करायला गेलेली मुले सुखरूप घरी न परतल्याने घरातील सर्वजण आक्रोश करीत अश्रू ढाळत होते. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कालीमाटी व परिसरातील गावेही दु:खात बुडाली होती व सर्वत्र शांतता पसरली होती. ऐकू येत होता तो फक्त त्या चार मुलांच्या घरातील सदस्यांच्या ढसाढसा रडण्याचा आवाज.

 

टॅग्स :floodपूर