शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरडा दिवस पाळा : डॉ. हुबेकर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

गोंदिया : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत स्थानीय डीईआयसी केंद्रात हिवताप, डेंग्यू व झिका आजाराबाबत जनजागरण अभियानाचे आयोजन ...

गोंदिया : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत स्थानीय डीईआयसी केंद्रात हिवताप, डेंग्यू व झिका आजाराबाबत जनजागरण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कीटकजन्य आजार प्रतिबंध कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालरोग तज्ज्ञ डाॅ. प्रदीप गुज्जर, वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिपाठी, मलेरिया पर्ववेक्षक गजभिये, परिचर्या अधिकारी रुपाली टोणे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा हुबेकर यांनी गोंदिया जिल्ह्यात गावोगावी वायरल फिव्हर, हिवताप, डेंग्यूच्या साथीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलेदेखील तापाने फणफणत आहेत. याला कारण म्हणजे अनियंत्रित डासांची पैदास होय. म्हणून आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणी साठविण्याचे भांडे स्वच्छ घासून पुसून कोरडे करा व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा. सांडपाण्याची विल्हेवाट लावा. बाथरूमच्या पाईपला जाळी बसवा, मच्छरदाणीचा वापर करा, आपल्या परिसर स्वच्छ ठेवल्यास मलेरिया आणि डेंग्यूपासून बचाव होऊ शकतो. कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो. त्यामुळे ताप अंगावर काढू नका. लगेचच आरोग्य केंद्रावर जाऊन मलेरिया, डेंग्यूसाठी रक्त तपासणी करून घ्या, असे आवाहन डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले. यावेळी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप गुज्जर यांनी लहान बालकांची मोसमी ज्वरात काय काळजी घ्यावी, आहारविहार कसा असावा, यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रणाली मनोहर यांनी केले तर आभार दीपाली पाणतावणे यांनी मानले.