शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: September 16, 2015 02:28 IST

शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे.

रेल्वेला निधी अप्राप्त : अंडरग्राऊंड केबल हटविण्याचे काम रेल्वेने केले बंदगोंदिया : शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे काम बंद आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेला निधी देणे गरजेचे होते. परंतु निधी न मिळाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने केबल हटविण्याचे आपले काम थांबविले आहे.शहराच्या हड्डीटोलीजवळ हा उड्डाण पूल बनविण्यात येत आहे. हा उड्डाण पूल तयार करण्याचा उद्देश म्हणजे या मार्गावर तिरोडा-बालाघाटच्या दिशांनी येणाऱ्या अवजड वाहनांना शहराच्या बाहेरूनच आमगाव व कोहमारा मार्गावर रवाना करणे व त्यामुळे अवजड वाहनांचा प्रवेश शहरात होणार नाही, असे आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या अपघातांच्या संख्येत कमी येईल व योग्य वेळी अवजड वाहने आपल्या ठिकाणी पोहोचू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या बांधकामासाठी राज्य शासनाने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. प्रत्यक्षात ३० कोटी ५६ लाख ३० हजार ९५९ रूपयांचा करारनामा करण्यात आला आहे. करारनाम्यानुसार २४ महिन्यांत म्हणजे १६ मे २०१६ पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. बालाघाटच्या दिशेकडे ४४६ मीटर व कोहमाराच्या दिशेकडे ५४६ मीटर लांब मार्ग त्याअंतर्गत बनविण्यात येणार आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१४-१५ दरम्यान १७.१५ कोटी रूपये व आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९.७४ कोटी रूपयांचे काम झाले आहे. आतापर्यंत २६.८९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सन २०१५-१६ मध्ये ३.८८ कोटी रूपये खर्चाची तरतूद शासनाने केली आहे. मात्र २१ कोटी रूपयांची मागणी शासनाकडून करण्यात आली आहे. ज्या गतीने सदर कामाची सुरूवात झाली होती, त्यावरून लवकरच वेळेच्या आत काम पूर्ण होईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु शासनाने बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून काम थंडबस्त्यात असून आतापर्यंत काम सुरू होण्याची चिन्हेसुद्धा दिसून येत नाही. (प्रतिनिधी)