शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावे रात्रभर अंधारात

By admin | Updated: May 15, 2015 00:52 IST

बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा

गोंदिया : बुधवार सायंकाळी ६ वाजतापासून अचानक वादळासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर तिरोडा तालुक्यातील पाच गावांमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण रात्र नागरिकांना उष्णतेच्या त्रासात, डासांच्या प्रकोपात व अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांना नळाच्या पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागले.बुधवारी सांयकाळी थोड्या प्रमाणात पाऊस व वारा आला. त्यामुळे सुरूवातीला तिरोडा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. एवढेच नव्हे तर तिरोडा शहारातीलही वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र तिरोडा शहरातील वीज पुरवठा अवघ्या एका तासाच्या आतच पूर्ववत झाला. अनेक गावांतीलसुद्धा वीज पुरवठा थोड्या कालावधीनंतर पूर्ववत सुरू झाला. मात्र चिरेखनी, तिरोडा रेल्वे चौकी, बस स्थानक परिसर, लोधीटोला, भुराटोला आदी गावांत तब्बल १८ तासांपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे या गावांतील नागरिकांना रात्रभर अंधारात राहून डासांचा व उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला. अनेकांनी संपूर्ण रात्र जागूनच काढली. अंधारात इतर सरपटणारे जीवजंतू घरात किंवा परिसरात शिरण्याची शक्यता असते. त्याची भीतीसुद्धा नागरिकांच्या मनात होती. शिवाय गरम झालेल्या जमिनीतून सायंकाळी पाऊस आल्याने वाफ निघत असल्याने संपूर्ण रात्र उष्णतेत काढावी लागल्याचे नागरिक सांगतात.दरम्यान रात्री अनेकांनी ग्रामीण विद्युत कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधून वीज पुरवठा कधी सुरू होणार, याची विचारणा केली. मात्र बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे. अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरू होईल, असे वीज कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु एक तास, दोन तास असे करीत संपूर्ण रात्र लोटून गेली, मात्र विद्युत पुरवठा सुरू होवू शकला नाही. विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे पाच गावांतील हजारो नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागल्याची चर्चा तिरोडा तालुक्यातील गावागावांत आहे. यानंतर काही गावांत दुसऱ्या दिवसी गुरूवारी दुपारी १२ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला होता. तर काही ठिकाणी दुपारी चार वाजतानंतरही वीज पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेकांचे मोबाईलसुद्धा बॅटरी चार्जिंगअभावी ठप्प पडले होते. त्यामुळे संपर्क साधने बंद पडले होते. विद्युतवर चालणारी अनेक उपकरणे घराघरांत बंद होते. या प्रकारामुळे नागरिकांनी विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)