शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त

By admin | Updated: May 17, 2017 00:11 IST

शहराला लागून असलेल्या पांगोली नदीच्या पात्रातील रेती जेसीबीने उपसा करुन ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती.

तुमखेडा रस्त्यावर कारवाई : पांगोलीतील रेतीचा केला जात होता उपसा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शहराला लागून असलेल्या पांगोली नदीच्या पात्रातील रेती जेसीबीने उपसा करुन ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. या संदर्भात गोंदियाचे तहसीलदार व त्यांच्या चमूने सोमवारच्या रात्री ११.५० वाजता कारवाई करुन रेती वाहून नेणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त करण्यात आली. पांगोली नदीतील रेती जेसीबी क्रमांक एसएचएआर ३ एसएससी ०२५१८३९२ या जेसीबीने रेती काढत असताना लोकेश बारकू टेकाम याला पकडण्यात आले. सोबतच मोहगाव येथील संजय हेतराम पटले यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एमएच ३५ जी-८५८८ व विना क्रमांक असलेली ट्रॉली असलेला ट्रॅक्टर, फुलचूर येथील पप्पू पटले यांच्या मालकीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, विश्वनाथ लक्ष्मण भांडारकर यांच्या मालकीचा एमएच ३५-८२८१ ट्रॉली एमएच ३५-एफ ३७७०, मोहगाव येथील जितेंद्र डागलाल पटले यांच्या मालकीचा एमएच ३५-जी ७६९६ विना क्रमांकाची ट्रॉली व खमारी येथील राजेंद्र भांडारकर यांच्या मालकीचा एमएच ३५-जी ६९०१ ट्रॉली एमएच ३५-एफ ४५५६ या वाहनांना रेती वाहून नेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या जवळून दिड लाख रुपये किमतीची रेती जप्त करण्यात आली. या संदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात भादंविच्या कलम ३७९ व ५११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार विजय पवार, तलाठी आर.एस. बोडके यांनी केली आहे.