शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पाच महसूल मंडळे आॅनलाईनपासून वंचित

By admin | Updated: November 16, 2016 01:17 IST

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल आदी साहित्यांचा पुरवठा महसूल विभागाकडून करण्यात आला.

गोंदिया : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जवळपास सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल आदी साहित्यांचा पुरवठा महसूल विभागाकडून करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील अनेक साज्यातून शेतकरी व नागरिकांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. शिवाय अनेक नागरिकांचे ई-फेरफार कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्याच्या महसूल मंडळातील पाच मंडळे अद्यापही आॅनलाईन होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे नागरिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात एकूण ३३ महसूल मंडळे आहेत. या महसूल मंडळांमध्ये एकूण ९४६ गावांचा समावेश आहे. यापैकी २८ मंडळे आॅनलाईन झाली आहेत. तर पाच मंडळांमध्ये कनेक्टिव्हिटी प्राब्लेम व इतर तांत्रिक अडचणींमुळे तेथील आॅनलाईन प्रक्रिया रखडली आहे. यात गोंदिया तालुक्यातील रतनारा व खमारी, तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव, आमगाव तालुक्यातील तिगाव व कट्टीपार या पाच गावांचा समावेश आहे.शासनाच्या आदेशाने सर्व मंडळे आॅनलाईन केली जात आहेत. मॅन्युअल फेरफार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना समस्या होवू नये यासाठी नवीन साफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. त्यात महसूल विभागाशी संबंधित कामांची डाटा एन्ट्री सुरू आहे. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॅप, प्रिंटर, नेटसाठी डोंगल, त्यासाठी दरमहा ७५० रूपये व जिल्हा सेतू संस्थेकडून आॅपरेटर्ससुद्धा पुरविण्यात आले आहेत. नवीन साफ्टवेअरच्या एडिट मॉड्युलमध्ये जावून संबंधित माहिती भरली जात आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत तलाठ्यांना देण्यात आली आहे. परंतु जिल्हाभरातील अनेक तलाठ्यांनी फेरफारचे कामच केले नसल्याचे समजते. कनेक्टिव्हिटीची समस्या उद्भवत असल्याने अनेकांचे संगणीकृत सातबारा, ८ अ, ई-फेरफार व त्यात दुरूस्तीचे काम रखडल्याचे तलाठ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक नागरिक व शेतकरी अडचणीत आले आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने ई-फेरफारमधील अडचणी, नेट कनेक्टिव्हिटी-स्पीड, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची पुनर्रचना, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये बांधून देणे, थकीत घरभाडे मंजूर करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत संपूर्ण तलाठी बुधवार दि.१६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात (सामूहिक रजा) सहभागी होत आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. त्यासाठी तलाठ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन या प्रस्तावित संपाची माहिती दिली.