शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य इंजेक्शनच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:12 IST

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता गृहात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याची घटना २४ एप्रिलला उघडकीस आली होती. यानंतर रुग्णालयात चांगलीच खळबळ उडाली होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत केली.

ठळक मुद्देकेटीएस रुग्णालयातील प्रकार : आरोग्य विभागात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता गृहात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याची घटना २४ एप्रिलला उघडकीस आली होती. यानंतर रुग्णालयात चांगलीच खळबळ उडाली होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत केली.या समितीने शनिवारी (दि.२७) केटीएस रुग्णालयाला भेट देवून चौकशी केल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी नगरसेवक लोकेश यादव हे २४ एप्रिलला गेले होते. दरम्यान रुग्णालयातील अतिदक्षात विभागात गेले असता तेथील टेबलवर त्यांना दोन मुदतबाह्य इंजेक्शन आढळले. एका इंजेक्शनची मुदत मार्च २०१८ तर दुसऱ्या इंजेक्शनची मुदत आॅक्टोबर २०१८ असल्याचे आढळले. मुदतबाह्य इंजेक्शन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आढळल्याने त्यांना सुध्दा धक्का बसला. त्यांनी लगेच हा प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला.मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नंदकिशोर जयस्वाल यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. केटीएस रुग्णालयातच मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याने दाखल असलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर यासंबंधिचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची यंत्रणा खळबळून जागी झाली. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुरूवातीला वैद्यकीय अधिष्ठाता रुखमोडे यांनी लगेच तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे यांनी या प्रकरणाची गांर्भियाने दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत केली. या समितीत उपविभागीय अनंत वालस्कर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे,जिल्हा शल्यचिकित्सक अमरिश मोहबे, लेखाधिकारी अनंत मडावी आणि अन्न व औषध विभागाचे रामटेके यांचा समावेश होता. या समितीने शनिवारी केटीएस रुग्णालयाला भेट देऊन मुदतबाह्य इंजेक्शन प्रकरणाची सखोल चौकशी केल्याची माहिती आहे. चौकशीनंतर ही समिती आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याची माहिती आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.रुग्णालय प्रशासनच अनभिज्ञकेटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतबाह्य इंजेक्शन नेमके आली कुठून याबाबत रुग्णालय प्रशासनच अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे. तसेच वैद्यकिय अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांनी गठीत केलेल्या चौकशी समितीचा अहवाल सुध्दा जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.व्हेंटिलेटर नादुरूस्तकेटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात चार व्हेंटिलेटर असून यापैकी दोन नादुरूस्त असल्याची बाब सुध्दा या प्रकारानंतर पुढे आली आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याप्रति आरोग्य विभाग किती सजग आहे हे दिसून येते. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारी