शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बालाघाट येथे पाच कोटींच्या बनावट नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST

गोंदिया : बनावट नोटांचा काळाबाजार करणाऱ्या ७ जणांना गोंदिया व बालाघाट पोलिसांनी संयुक्त कामगिरी करीत रविवारी (दि. २७) अटक ...

गोंदिया : बनावट नोटांचा काळाबाजार करणाऱ्या ७ जणांना गोंदिया व बालाघाट पोलिसांनी संयुक्त कामगिरी करीत रविवारी (दि. २७) अटक केली आहे. यामध्ये त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ५ आरोपी बालाघाट येथील, तर २ आरोपी गोंदिया येथील आहेत. यावरून पोलिसांनी नक्षली कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैहर व बालाघाट येथे बनावट नोटा चालविल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. यावर मागील २ दिवसांपासून बैहर पोलिसांसोबत ऑपरेशन राबविले जात होते. अशात बालाघाट येथून राहुल घनश्याम मेश्राम (२५), अनंतराम जंगली पांचे (३८), हरिराम रामेश्वर पांचे (३३), नन्हूलाल किशन विश्वकर्मा (४०), हेमंत आत्माराम (४०, सर्व रा. किरनापूर) यांना आठ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पकडण्यात आले. विचारपूस केली असता त्यांनी गोंदिया जिल्ह्यातून बनावट नोटांचा सप्लाय होत असल्याचे सांगितले. यानंतर बालाघाट पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने मुकरू उर्फ मुकेश वकटू तवाडे (३०) व रामू उर्फ रामेश्वर रंगलाल मौजे (४०,रा. गोंदिया) यांना अटक केली. त्यांना या बनावट नोटा कोठून व कधीपासून होत आहे याबाबत विचारणा सुरू आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात बैहर पोलीस ठाण्यांतर्गत मुक्की रोडवरील बाम्हणी चौकात पोलिसांनी बनावट नोटा चालविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ जणांना चार लाख ९४ हजार रुपयांसह अटक केली होती. पोलीस अधीक्षक तिवारी यांच्यानुसार या प्रकरणाशी त्यांची लिंक असून ही एकच टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

....

दहा रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतच्या नोटा

जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये १० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश आहे. त्यात दोन हजार रुपयांच्या नोटा जास्त असून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा बनविण्यासाठी स्कॅनर व कलर प्रिंटर वा अन्य कोणत्या मशीनचा वापर केला जात आहे याचा तपास पोलीस करीत आहे. बनावट नोटांचा कारभार किरनापूर व गोंदिया जिल्ह्याशी जुळलेला असल्याची माहिती असल्याने पोलिसांचे वेगवेगळे पथक त्या दिशेने टोळीच्या मुख्य आरोपीच्या शोधात आहे.

-------------------------------

जगदलपूर येथे मिळाले होते ७.९ कोटींच्या बनावट नोटा

बालाघाट येथून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथे ३ मार्च रोजी सात कोटी ९० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या नोटा जगदलपूर येथून विशाखापट्टनम येथे पोहचविल्या जात होत्या. ओडिसा पोलिसांनी तपासणीदरम्यान एका फोर्ड कारमधून चार ट्रॉली बॅगसोबत ३ जणांना अटक केली होती. बॅगमध्ये ५०० रुपयांच्या नोटांसह १५८० बंडल होते. त्यानंतर ११ मार्च रोजी बैहर येथे चार लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या.