शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरू

By admin | Updated: August 25, 2015 02:28 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले होते. नुकसान भरपाई

काचेवानी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने तिरोडा तालुक्यासाठी ४ कोटी ९५ लाख रूपये मंजूर केले आहे. नुकसान ग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी महसूल विभागाला दिले आहेत.फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात तिरोडा तालुक्यातील शेतकरी सापडले होते. जिरायती व बागायती पिकांचे मोठेच नुकसान झाले होते. तालुक्यातील १२५ गावांना याचा फटका बसला होतो. तर १२ हजार २९९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. जिरायती शेतातील गहू, हरभरा, जवस व इतर तसेच बागायती पिकांमध्ये भाजीपाला आदी पिके संपूर्ण नष्ट झाली होती. भरपाई त्वरित मिळण्यासाठी शेतकरी सतत पाठपुरावा करीत होते. याची दखल तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी घेऊन राज्य शासनाकडून तिरोडा तालुक्यासाठी चार कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर करून आणला. अवकाळी पाऊस व गारपीट यात ज्यांच्या शेतातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी १० हजार रूपये (एकरी चार हजार रूपये) दिले जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व त्यांना देय असणारी रकमेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीला यादी मिळाली नसेल त्यांनी त्वरित न्यावे, असे आ. विजय रहांगडाले यांनी सांगितले.सर्वाधिक नुकसानग्रस्त भागात अर्जुनी क्षेत्राचा समावेश आहे. तसेच नुकसानग्रस्त गावांमध्ये घाटकुरोडा १९४ हेक्टर (१९.४० लाख), सोनेगाव १४७.२७ हेक्टर (१४.७२ लाख), चांदोरी (बु.) १२० हेक्टर (१२ लाख), कवलेवाडा ११४ हेक्टर (११.४० लाख), मेंढा १११ हेक्टर (११.१० लाख), परसवाडा ९० हेक्टर (नऊ लाख), गोंडमोहाळी ८१ हेक्टर (८.१० लाख), भजेपार ६१ हेक्टर (६.१० लाख) व सुकडी-डाकराम ६३.३६ हेक्टर (६.३४ लाख) एवढे रूपये मिळणार आहेत. सर्वात कमी नुकसान दर्शविण्यात आले, त्यात चोरखमारा ०.२० हेक्टर, भुराटोला १.२० हेक्टर, पुजारीटोला एक हेक्टर व भोंभोडी येथे २० हेक्टरचा समावेश आहे. भोंभोडी येथे नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २०० आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी बंँक खाते तपासावे४शेतकऱ्यांनी उसनवारीने पैसे घेऊन कर्जबाजारी होऊन शेतीची कामे पूर्ण केली. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भरपाई रक्कम देण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्याला वेठीस धरण्यात येईल. ५० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून आठ दिवसात पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासावे, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले आहे.मी शेतकऱ्याचा मुलगा असून मला शेती व शेतकऱ्याचा अनुभव आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकरी विशेषकरून तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील शेतकरी दीन-दुबळ्याचे जीवन जगत आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही दु:ख, समस्या व अडचणी सरकार दरबारी ठेवून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार.’’-आ. विजय रहांगडाले,विधानसभा क्षेत्र, तिरोडा-गोरेगाव.