शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा पहिला दिवस गणवेशातच

By admin | Updated: June 15, 2016 02:21 IST

दरवर्षी अर्धेअधिक सत्र उलटूनही गणवेश विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. परंतु यावर्षी पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याची व्यवस्था

२.९५ कोटीची तरतूद : ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांना दोन गणवेशगोंदिया : दरवर्षी अर्धेअधिक सत्र उलटूनही गणवेश विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. परंतु यावर्षी पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याची व्यवस्था म्हणून १५ दिवसापूर्वीच मुख्याध्यापकांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आल्याची माहिती सर्वशिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच गणवेश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी शासनाने दोन कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये गोंदिया जिल्ह्याला दिले आहेत. एका विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जाणार आहेत. एका गणवेशापोटी २०० रूपये तर दोन गणवेशांसाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्यामागे त्यांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकण्यात आले आहे. गणवेश अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र रेषेखालील मुले व सर्व मुलींना गाणवेश दिले जातात. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८०९६ विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ३८ हजार ४०० रूपये, आमगाव तालुक्यातील ७७०३ विद्यार्थ्यांसाठी ३० लाख ८१ हजार २०० रूपये, देवरी तालुक्यातील ६०८७ विद्यार्थ्यांसाठी २४ लाख ३४ हजार ८०० रूपये, गोंदिया तालुक्यातील २०४५८ विद्यार्थ्यांसाठी ८१ लाख ८२ हजार २०० रूपये, गोरेगाव तालुक्यातील ७६२४ विद्यार्थ्यांसाठी ३० लाख ४९ हजार ६०० रूपये, सालेकसा तालुक्यातील ६२९३ विद्यार्थ्यांसाठी २५ लाख १७ हजार २०० रूपये, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६८८८ विद्यार्थ्यांसाठी २७ लाख ५५ हजार २०० रूपये, तिरोडा तालुक्यातील १०७११ विद्यार्थ्यांसाठी ४२ लाख ८४ हजार ४०० रूपये मुख्याध्यापकांच्या खात्यात टाकण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ७३ हजार ८६० विद्यार्थ्यांसाठी २ कोटी ९५ लाख ४४ हजार रूपये पाठविण्यात आले आहेत. गणवेशासाठी देण्यात येणारा निधी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वळता करण्यासाठी चार दिवसापूर्वीच पाठविला असल्याची माहिती सर्वशिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांंनी दिली. (तालुका प्रतिनिधी)