शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आग

By admin | Updated: May 30, 2015 01:15 IST

गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील जुन्या इमारतीत मागच्या बाजुने असलेल्या एका टिनाच्या खोलीला आग लागून त्यातील संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली.

जुनी कागदपत्रे जळाली : सकाळी ८ वाजतादरम्यानची घटनागोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील जुन्या इमारतीत मागच्या बाजुने असलेल्या एका टिनाच्या खोलीला आग लागून त्यातील संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. ही कागदपत्रे महत्वाची नसून टाकाऊच असल्याचे सांगितले जात आहे.पोलीस अधीक्षकांचे कार्यालय पतंगा मैदानात गेल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्या इमारतीत शहर पोलीस स्टेशनचा कारभार स्थानांतरित करण्यात आला. त्यामुळे त्याच आवारात असलेल्या जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजुने ज्या ठिकाणावरून पूर्वी ‘डी.बी.’चा (शोध शाखा) कारभार चालत होता त्याच खोलीत ही आग लागली. स्लॅबच्या पक्क्या खोलीच्या बाजुनेच बनविलेल्या टिनाच्या खोलीत काही जुनी कागदपत्रे ठेवलेली होती. जुन्या आरोपींची माहिती, छायाचित्रे व इतर कागदपत्रे त्यात असल्याचे समजते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र ते पोहोचेपर्यंत आगीच्या भडक्याने बाहेरील खोलीतून मुख्य इमारतीच्या खिडकीलाही कवेत घेत आतमधील पंख्याची वायरिंगही राख केली. सकाळी सर्वजण उठलेले असताना आग एवढी भडकेपर्यंत कोणाच्या लक्षात कसे आले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय ही आग नेमकी कशामुळे लागली हे सुद्धा गुलदस्त्यात आहे.सध्या शहर पोलीस ठाण्याची ही जुनी इमारत रिकामीच आहे. त्यामुळे मागील बाजुने कोणीही त्या इमारतीत प्रवेश करून काहीही करू शकते. त्यामुळे या इमारतीचा सदुपयोग करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. युनिफॉर्मला आसही नाही पक्क्या इमारतीच्या खोलीची खिडकी जळून बाहेरील खोलीतील आगीच्या ज्वाळा आत आल्या. त्या खोलीत एका खुंटीला टांगून पोलीस उपनिरीक्षकाचा हिवाळ्यात वापरायचा युनिफॉर्म व कॅप टांगून होते. आगीच्या आसेने तेथील पंख्यापर्यतची आणि विद्युत बोर्डापर्यंतची वायरिंग जळाली. मात्र तिथेच असलेला युनिफॉर्म, कॅपला काहीच झाले. विशेष म्हणजे आगीच्या घटनेनंतरही तो युनिफॉर्म तेथून हटविण्यात आला नाही.