शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बेपत्ता नितीनचा मृतदेहच विहीरीत सापडला

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

शुक्रवारी सकाळी १०.३० वाजतापासून घरुन खेळता-खेळता अचानक बेपत्ता झालेल्या ३ वर्षीय नितीन विलास पुस्तोडे या निरागस बालकाचा मृतदेह ...

बोंडगावदेवी : शुक्रवारी सकाळी १०.३० वाजतापासून घरुन खेळता-खेळता अचानक बेपत्ता झालेल्या ३ वर्षीय नितीन विलास पुस्तोडे या निरागस बालकाचा मृतदेह शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान गंगाजमुना मातेच्या देवस्थान परिसरातील विहीरीमध्ये दिसून आला. मंदिरालगत राहत असलेल्या विलास श्रीराम पुस्तोडे यांचा मुलगा नितीन (वय ३ वर्ष, २ महिने) हा शुक्रवारी (दि.१) सकाळी १० वाजतदरम्यान जवळच्या मंदिर परिसरात खेळायला गेला होता. सकाळच्या जमुना मातेच्या आरतीला सुध्दा नितीन मंदिरात हजर होता असे बोलल्या जाते. नितीनचे वडील, आजी-आजोबा लग्न कार्यासाठी बाहेर गावाला गेले होते. घरी त्याची आई चंद्रकला (३०) हजर होती. मुलगा मंदिरात खेळत आहे असा त्या मातेचा समज झाला. जेवणासाठी ती बोलवायला परिसरात गेली असता तिला नितीन आढळून आला नाही. मुलगा दिसत नाही म्हणून तिने सकाळच्या १०.३० वाजतापासून नितीनचा शोध घेणे सुरू केले. आपला एकुलता एक मुलगा असलेला नितीन एका-एकी कुठे गेला याच विचारात आईने दिवसभर हंबरडा फोडला. आपल्या आप्तस्वकीय व नातलगाच्या सहाय्याचे संपूर्ण गाव पिंजून काढले. परंतु कुठेही नितीनचा ठावठिकाणा लागला नाही. परिसरात सर्वत्र आवडता असलेल्या नितीनचे कोणी अपहरण तर केले नाही ना? अशी शंका वर्तविण्यात आली. सर्वत्र शोधाशोध करूनही कोणताच सुगावा लागत नाही. त्यामुळे रात्री बऱ्याच उशिरा नितीनची आई चंद्रकलाबाईने आपल्या मुलाला कोणीतरी पळवून नेले असा संशय व्यक्त करणारी तक्रार पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरून पोलीस ताफा गावात आला. गावातील तलाव, बोडी, काही विहीरीसुध्दा पाहून घेतल्या, परंतु नितीनचा ठावठिकाणा लागला नाही. एकुलता एक मुलगा गायब झाल्याची वार्ता नातलगांमध्ये पसरताच सर्व नातलग आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. अखेर एका नातलगाने मंदिरातील विहीरीमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अंदाजे ३.३० वाजताच्या सुमारास नितीनचा मृतदेह पाण्यामध्ये दिसून आला. घराजवळून अवघ्या काही अंतरावर असलेल्या विहीरीमध्ये २९ तासानंतर त्या गोंडस मुलाचा मृतदेह होता. फुलाप्रमाणे नितीनला सांभाळणाऱ्या मातेला खेळत्या बागडत्या नितीनचा मृतदेहच हाती लागल्याने तिला शोक अनावर झाला होता. ते पाहून ग्रामवासीयांचेही डोळे पाणावले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवचिकीत्सेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथे पाठविण्यात आला. ठाणेदार नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश गझल पुढील तपास करीत आहे.नितीन त्या विहिरीमध्ये पडला की काही घातपात झाला? त्यावेळी तिथे कोणीच नव्हते का? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.(वार्ताहर)