शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

३८.४५ कोटींच्या पुनर्वसन पॅकेजला अंतिम मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 02:04 IST

बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे नशीब अखेर फळफळले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ३८.४५ कोटींच्या पॅकेजला

बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी खूशखबर : उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाले आदेशलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे नशीब अखेर फळफळले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ३८.४५ कोटींच्या पॅकेजला केंद्र शासनाने अंतीम मंजूरी दिली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे बिरसी विमान क्षेत्राचे विमान पतन निदेशक संदीप पिंपळापुरे यांनी याबाबत अधिकारीक आदेश काढले आहेत. बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजसाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधान भवन स्थित कार्यालयात भारतीय विमानपत्तन प्राधीकरण चे विभागीय कार्यकारी संचालक के.एल.शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधीत अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. येथे आमदार अग्रवाल यांनी, शर्मा यांना बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र शासनाच्या मंजूरीसाठी वैयक्तीकरित्या विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. तसेच विमानतळामुळे बाधीत कामठा-परसवाडा रस्त्याचे अधिग्रहण होण्याची स्थितीत पर्यायी रस्ता निर्माण करून तोपर्यंत वर्तमान रस्ता खुला ठेवणे व त्याची दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले होते. आमदार अग्रवाल यांच्या निर्देशावरून भारतीय विमानपत्तन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांकडून प्रलंबीत पॅकेजसाठी दिल्लीत प्रयत्न घेण्यात आले. तर आमदार अग्रवाल यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री अशोक अशोक गजपती राजू यांनाही पॅकेजच्या मंजूरीसाठी निर्देश देण्याची मागणी केली होती. परिणामी नागरी विमानन मंत्रालयाच्या समितीने राज्य शासनाकडून प्रस्तावीत ३८.४३ कोटींच्या पुनर्वसन पॅकेजला मंजूर दिली होती. तर विमानपत्तन प्राधीकरणचे विभागीय कार्यकारी संचालक शर्मा यांच्या निर्देशावरून कामठा-परसवाडा रस्ता दुरूस्तीचे कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान बिरसी विमान क्षेत्राचे विमानपत्तन निदेशक पिपंळापुरे यांनी निदेशक मंडळाच्या बैठकीतील निर्णय बघत राज्य शासनाकडून प्रस्तावीत ३८.४५ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरीचे अधिकारीक पत्र काढून कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.