शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीत आरक्षण देऊन शासकीय सेवेतील सर्व जागा त्वरित भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

गोंदिया : इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देऊन शासकीय सेवेतील रिक्त असलेल्या सर्व जागा त्वरित भराव्या. यासह मागासवर्गीय ...

गोंदिया : इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देऊन शासकीय सेवेतील रिक्त असलेल्या सर्व जागा त्वरित भराव्या. यासह मागासवर्गीय कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघाने कॉँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देऊन चर्चा केली.

निवेदनात, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेले ७२ वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे, क्रिमिलीअरसाठी लागणारी उत्पन्न मर्यादा १५ लाखांपर्यंत करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा तयारीसाठी तालुकास्तरावर अभ्यासिका केंद्र उघडण्यात यावे, जिल्ह्यातील रोस्टरमध्ये ओबीसी कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करणे, विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता लागणारे उत्पन्नाचे दाखले व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक खात्याची अट वगळणे आदी मागण्या नमूद असून त्यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी पटोले यांनी, सर्व मागण्यांसाठी सचिव स्तरावरील सभा आयोजित करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. चर्चेला जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, कार्याध्यक्ष किशोर डोंगरवार, तिरोडा तालुकाध्यक्ष डी. एच. चौधरी, तालुकाध्यक्ष सदानंद मेंढे, जिल्हा समन्वयक दीपक कापसे, दिलीप लोधी, नरेंद्र बनकर, शितल कनपटे, विरेंद्र खोटेले, जितेंद्र ठवकर, भोजराज फुंडे, गजानन पाटणकर, गुणीराम ठाकरे, अरुण सावरकर, टी .के.बोपचे, बी.सी. ठाकरे, वामन मोवाडे, राजेश मरघडे, सी.बी.गोबाडे, बेनीराम भानारकर, होमराज बहेकार, आनंद मेश्राम, छगन परशुरामकर, शिशुपाल भांडारकर, कृष्णा शिवणकर उपस्थित होते.