शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

संविधानविरोधी वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: June 15, 2016 02:25 IST

इंदिरा गांधी नॅशनल सेंटर आॅफ आर्ट्सचे (आयजीएनसीए) अध्यक्ष व एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादूर रॉय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर....

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आयजीएनसीएच्या अध्यक्षाचा केला निषेधगोंदिया : इंदिरा गांधी नॅशनल सेंटर आॅफ आर्ट्सचे (आयजीएनसीए) अध्यक्ष व एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादूर रॉय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान याबाबत चुकीचे वक्तव्य केले. बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या असून रॉय यांच्यावर राष्ट्रद्रोह व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने केली आहे.प्राप्त माहितीनुसार, आयजीएनसीएचे अध्यक्ष रामबहादूर रॉय यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेच नाही. त्यांनी केवळ संविधानाची भाषा दुरूस्ती केली, असे बेताल व्यक्तव्य केले. तसेच भारतीय संविधानाला आग लावायला कुणी सांगितले तर सर्वप्रथम मी आग लावेन, असे ते बोलले. भारताप्रमाणेच संपूर्ण जगात बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. रामबहादूर रॉय यांचे बेताल व्यक्तत्व लक्षात घेता, अशा मानसिक विकृतीच्या व्यक्तीला आयजीएनसीएच्या चेअरमन पदावर राहण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. रॉय यांनी संविधानाचा अनादर केल्यामुळे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा, डॉ. आंबेकरांबद्दल बेताल व्यक्तत्व केल्यामुळे व अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावून धार्मिक भावना भडकविल्याबद्दल त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गतचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच आयजीएनसीएच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने निवेदनातून केली आहे.याप्रसंगी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विशाल शेंडे, श्याम चौरे, लक्ष्मीकांत डहाटे, इसुलाल भालेकर, किशोर मेश्राम, राजीव दोनोडे, अनिल गेडाम, बाबा जांगडे, सुरेश नागदेवे, सूर्यकांत डोंगरे, विवेक मौजे, मनोज वालदे, रतन वासनिक, पी. कामदे, डी.आर. वैद्य, सुनील शहारे, चुन्नीलाल मुटकुरे, अनिल डोंगरे, सुशील ठवरे, देवा रूसे, जगदीश वासनिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)