शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या दिवशीही कवलेवाड्यात तणावपूर्ण शांतता कायम

By admin | Updated: May 22, 2014 01:12 IST

तालुक्यातील कवलेवाडा येथील एका दलित व्यक्तीवर रॉकेल टाकून पेटविण्याच्या प्रकरणाचे पडसाद

गोरेगाव : तालुक्यातील कवलेवाडा येथील एका दलित व्यक्तीवर रॉकेल टाकून पेटविण्याच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही गावात कायम आहे. बुधवारी पाचव्या दिवशीही गावात तनावपूर्ण शांतता होती.

सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या संजय खोब्रागडे जळीत प्रकरणामुळे कवलेवाडा गाव प्रकाशझोतात आले. कधीकाळी साधे नावही माहित नसलेल्या कवलेवाडा गावात मंत्र्यांपासून तर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या भेटी होत आहेत. यात खोब्रागडे यांच्या मृत्यूपूर्व बयानात त्यांनी ज्यांची नावे घेतली तेच आरोपी आहेत हे गावकर्‍यांना पचनी पडत नव्हते. पोलिसांनी वास्तविकता जाणून घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगळ्या दिशेने फिरविल्यावर या प्रकरणात धक्कादायक बाबी पुढे आल्या.

सदर प्रकार दलितावरील अत्याचाराचे नसून जखमी इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे सोमवारी सायंकाळी पोलिसांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणाकडे कवलेवाडा येथे भयभीत वातावरण आहे. गावात गेल्या पाच दिवसांपासून पोलीसांचा बंदोबस्त आहे. साध्या वेशभुषेत पोलीस गावात, पानटपर्‍यावर बसून गावातील तनावपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. घटनास्थळाच्या जवळ पोलीस छावणी असून चोख बंदोबस्त आहे.

या जळीत प्रकरणामुळे गावकर्‍यांच्या विविध चर्चा सुरू आहेत. पानटपर्‍यावर बसून गावकरी घडलेल्या प्रकरणाविषयी संताप व्यक्त करताना दिसतात. पण त्याहीपेक्षा ‘त्या’ सहा लोकांना उगीचच फसविले हा मोठा संताप गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर त्यांच्या बोलणावरुन प्रकर्षाने जाणवतो. दुसरीकडे पत्नी आणि प्रियकराने संजय खोब्रागडेला कसे काय जाळले असेल? ‘इसके पिछे कोई मास्टरमाईंड होगा’ मध्येच कुणीतरी असे हिंदीत आपल्या शंकेला वाट करून देतो, पुन्हा तर्कवितर्क सुरू होतात. तासनतास चालणार्‍या या गावकर्‍यांच्या चर्चा संपता-संपत नाही. (तालुका प्रतिनिधी)