शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोक्याला ई-पीक पाहणीचा ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

गोंदिया : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी जमिनीच्या सातबारावर आता स्वतःच ई-पीक पाहणी ॲपच्या सहाय्याने माहिती भरणे शासनाने बंधनकारक केले ...

गोंदिया : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी जमिनीच्या सातबारावर आता स्वतःच ई-पीक पाहणी ॲपच्या सहाय्याने माहिती भरणे शासनाने बंधनकारक केले आहे. हे मात्र शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शासनाने हे काम कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे असा सूर उमटत आहे. पीक कर्ज, पीक विमा आदींचा लाभ घ्यायचा असेल तर स्वतः शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीक पेरा भरावायचा आहे. ग्रामीण भागात आजही अनेक शेतकऱ्यांच्या हाती अँड्रॉईड मोबाईल नाही. मोबाईल असले तरी व्यवस्थित नेटवर्क नाही. ८० टक्के शेतकऱ्यांना हे ॲप कसे डाऊनलोड करायचे, कशी माहिती भरायची याचे ज्ञान नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप होत सल्याचे चित्र आहे.

.........

कोट

शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची अचूक नोंद करता यावी यासाठी शासनाने ई-पीक ॲपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाऊन नोंदणी करावी लागणार नाही. तर तलाठ्यालासुध्दा शेतापर्यंत जाण्याची गरज नाही. दोघांसाठीही हा ॲप महत्त्वपूर्ण आहे.

- गणेश घोरपडे, अधीक्षक कृषी अधिकारी

................

हाताळणी कोण शिकविणार

शेतातील पिकांचे फोटो त्या ॲपमध्ये अपलोड करावयाचे आहेत. शेतकऱ्यांना आधीच एक ना अनेक समस्या आहेत. त्यातही आता शासनाच्या या निर्णयामुळे डोकेदुखी वाढली आहे. शिवाय या ॲपची हाताळणी कशी करायची याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

- संजय टेंभरे, शेतकरी

......................

ई-पीक पाहणी ॲपमध्ये किती शेतकरी माहिती भरणार हे वेळच सांगणार असले तरी माहिती न भरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून मुकावे लागणार आहे. शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईलचा अभाव आहे. त्यामुळे माहिती भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

- रामदास बोरकर, शेतकरी

.................

एकूण शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी : ३५२७०

ॲक्टिव्ह : १५४३२

इनॲक्टिव्ह : १४५५८

..........................