शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या डोक्याला ई-पीक पाहणीचा ताप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

गोंदिया : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी जमिनीच्या सातबारावर आता स्वतःच ई-पीक पाहणी ॲपच्या साहाय्याने माहिती भरणे शासनाने बंधनकारक केले ...

गोंदिया : शेतकऱ्यांना विविध योजनांच्या लाभासाठी जमिनीच्या सातबारावर आता स्वतःच ई-पीक पाहणी ॲपच्या साहाय्याने माहिती भरणे शासनाने बंधनकारक केले आहे. हे मात्र शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शासनाने हे काम कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे असा सूर उमटत आहे. पीक कर्ज, पीक विमा आदींचा लाभ घ्यायचा असेल तर स्वतः शेतकऱ्याला ई- पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीक पेरा भरावायचा आहे. ग्रामीण भागात आजही अनेक शेतकऱ्याच्या हाती अँड्रॉइड मोबाईल नाही. मोबाईल असले तरी व्यवस्थित नेटवर्क नाही. ८० टक्के शेतकऱ्यांना या ॲप कसा डाऊनलोड करायचा, कशी माहिती भरायची याचे ज्ञान नाही. त्यामुळे ई-पाहणीचा शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप होत आसल्याचे चित्र आहे.

.........

कोट

शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची अचून नोंद करता यावी यासाठी शासनाने ई-पीक ॲपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाऊन नोंदणी करावी लागणार नाही. तर तलाठ्याला सुध्दा शेतापर्यंत जाण्याची गरज नाही. दोघांसाठीही हा ॲप महत्वपूर्ण आहे.

- गणेश घोरपडे, अधीक्षक कृषी अधिकारी

................

हाताळणी कोण शिकविणार

शेतातली पिकांचे फोटो त्या ॲपमध्ये अपलोड करावयाची आहे. शेतकऱ्यांना आधीच एक ना अनेक समस्या आहेत. त्यातही आता शासनाच्या या निर्णयामुळे डोकेदुखी वाढली आहे. शिवाय या ॲपची हाताळणी कशी करायची याही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

- संजय टेंभरे, शेतकरी

......................

ई- पीक पाहणी ॲपमध्ये किती शेतकरी माहिती भरणार हे वेळच सांगणार असले तरी माहिती न भरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून मुकावे लागणार आहे. शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलचा अभाव आहे. त्यामुळे माहिती भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

- रामदास बोरकर, शेतकरी

.................

एकूण शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी : ३५२७०

ॲक्टिव्ह : १५४३२

इनॲक्टिव्ह : १४५५८

..........................

कोणत्या तालुक्यात किती नोंदणी

तालुका नोंदणी ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह

गोंदिया २२३४ १५२३ ७११

गोरेगाव १५२७ ९५४ ५७३

सडक अ. १८५६ ११३३ ७३३

अर्जुनी मो २२६५ १८६० ४३५

आमगाव १५६७ ९६८ ५९९

देवरी ९८० ६३० ३५०

सालेकसा १२५४ ७८० ४७४

तिराेडा १२३० ५३० ५००

..............................................................................