शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

गोंदिया : आरोग्य विभागाने मागील तीन वर्षांपासून सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे गोवर आणि रूबेलावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश ...

गोंदिया : आरोग्य विभागाने मागील तीन वर्षांपासून सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे गोवर आणि रूबेलावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्येच आढळून येते. मात्र, काही ठिकाणी मोठ्यांमध्येही या आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप आणि पुरळ असल्यास ते गोवर किंवा रूबेलाचे लक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजाराची लक्षणे दिसताच डाॅक्टरांना दाखविणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या गोवर आणि रुबेलाचा एकही रुग्ण नाही. २०१८ पासून गोवर आणि रुबेलावर प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या नाहीच्या बरोबरीत आहे. तसेच लोकांमध्येसुद्धा बऱ्याच प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे.

.................

असे केले जाते निदान

- लहान मुलांच्या अंगावर लालसर पुरळ येणे

- डोळे लालसर होणे, पाणी गळणे

- नाकातून पाणी गळणे

- सतत तीन-चार दिवस ताप असणे

....................

१०० टक्के गोवर, रुबेलाचा लसीकरण

आरोग्य विभागाच्या वतीने सन २०१८ पासून ९ ते १५ महिन्यांच्या बालकांना गोवर आणि रुबेलाचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. हे लसीकरण अनिवार्य करण्यात आले असल्याने मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात गोवर आणि रुबेलाच्या रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे. ९ ते १५ महिने वयोगटातील बालकांना गोवर आणि रुबेलाचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे.

............

...तर त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

लहान मुलांच्या अंगावर लालसर पुरळ अथवा तीन-चार दिवस ताप असल्यास ही लक्षणे गोवरची असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच त्वरित जवळचे रुग्णालय गाठून डॉक्टरांना दाखवून उपचार करून घेणे आवश्यक आहे. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होते.

................

रुग्णांचे प्रमाण नगण्य

९ ते १५ महिन्यांपर्यंतच्या बालकांना आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातसुद्धा गोवर, रुबेलाचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरात या आजाराच्या रुग्णांची नोंद झालेली नाही. यासाठी लसीकरण हे प्रभावी ठरत आहे.

- डाॅ. सुनील देशमुख, बालरोग तज्ज्ञ