शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुण्यांसाठी १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST

दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या ही गोंदिया जिल्ह्यात आहे. मागील सात-आठ वर्षांपासून सेवा संस्था व इतर ...

दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या ही गोंदिया जिल्ह्यात आहे. मागील सात-आठ वर्षांपासून सेवा संस्था व इतर पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्था सारस संवर्धनासाठी काम करीत आहेत. त्यामुळेच सारस पक्ष्यांची संख्या जिल्ह्यात ३९ वर पोहोचली असून सारसांचा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याला प्राप्त हाेत आहे. तर हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी नवेगावबांध व इतर जलाशयावर दाखल होतात. यामुळेच दूरवरून पर्यटक गोंदिया येथे हजेरी लावतात. यामुळे अलीकडे पर्यटन व्यवसायाला सुद्धा चालना मिळू लागली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. धान हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळेच ३ हजार किमी अंतरावर विदेशी पक्षी जिल्ह्यात हजेरी लावतात. यात प्रामुख्याने सायबेरिया, पूर्व चीन, युरोप, इंग्लड, बांगलादेश, लद्दाख, पूर्व आशिया या देशातील पक्षी दरवर्षी जिल्ह्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. नवेगावबांध, झिलमिली, सलंगटोला, सोदलागोंदी या जलाशयावर विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळेच आता पक्ष्यांचे आवडते खाद्य असलेल्या दहा प्रकारच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने परसूड, हरक, कमल, शिमनी फूल, लेंडुरली, डेहंगो, दात्या, सावा, कईस, उरसड आदी गवताचा समावेश आहे. हे गवत विदेशी पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याचे बोलल्या जाते. गोंदिया वन विभागाने या जलाशयात गवताची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांसाठी १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी मिळणार आहे.

....................

नवेगावबांध जलाशयातून आणले जातेय गवत

नवेगावबांध जलाशयात विविध जैविक खाद्य असल्याने या परिसरात दरवर्षी विदेशी पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आगमन होते. याच जलाशयातील गवत आणून जिल्ह्यातील विविध तलावांच्या परिसरात लागवड केली जात आहे. यामुळे पक्ष्यांच्या संवर्धनासह जैवविविधता वाढविण्यास सुद्धा मदत होणार आहे.

.......

कोट

जिल्ह्यात दरवर्षी विदेशी पक्षी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. ही संख्या वाढावी तसेच त्यांचे आवडते खाद्य त्यांना मिळावे यासाठी दहा प्रकारच्या गवताची जलाशयालगत लागवड केली जात आहे. या पक्षांचे संवर्धन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे.

- मुकुंद धुर्वे, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया

.............