शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणातील उपवासही महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

कपिल केकत गोंदिया : श्रावणमास येताच हिंदू धर्मीयांच्या सणासुदीला सुरुवात होते. श्रावणातले सोमवार हे बहुतांश हिंदू धर्मीय करीत असून, ...

कपिल केकत

गोंदिया : श्रावणमास येताच हिंदू धर्मीयांच्या सणासुदीला सुरुवात होते. श्रावणातले सोमवार हे बहुतांश हिंदू धर्मीय करीत असून, येथूनच अन्य सणांमध्ये उपवास ठेवण्याची प्रथा आहे. आता उपवास म्हटला म्हणजे त्यात शेंगदाणे, साबुदाणा व भगर आलीच. या शिवाय उपवासाचे पदार्थ तयार करणे शक्यच नाही. यामुळेच आता श्रावणातच्या उपवासापासून शेंगदाणे, साबुदाणा व भगरची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, या वस्तूंची मागणी वाढल्यामुळे व त्यातच ट्रान्सपोर्टचे दर वाढल्याने या वस्तूंचेही दर आता चढल्याचे दिसत आहे. आजघडीला प्रत्येकच घरात श्रावणातला सोमवार करणाऱ्या व्यक्ती असल्याने त्यांना उपवासाचे पदार्थ लागतच आहेत. मागणी वाढली असली, तरीही या वस्तूंची कमतरता नसून, चढ्या दरात का असेना मात्र, त्यांची खरेदी करावीे लागतच आहे.

----------------------------

१) असे वाढले दर (प्रति किलो)

श्रावणाआधी आता

साबुदाणा ७० ८०

शेंगदाणे १४० १६०

------------------------

२) आवक घटली, मागणी वाढली

साबुदाणा - उपवासाचे बहुतांश पदार्थ साबुदाण्यापासूनच तयार केले जातात. उपवासाची उसळ म्हणा की, उपवासाचे वडे, त्यात साबुदाणा हवाच, यामुळेच साबुदाण्याची मागणी वाढली आहे.

- जिल्ह्यात साबुदाणा नागपूर येथून आणला जातो. आता उपवासांमुळे साबुदाण्याला मागणी असली, तरीही त्याचे शॉर्टेज नाही. त्यामुळे साबुदाणा उपलब्ध आहे.

शेंगदाणा - उपवासातील कोणत्याही पदार्थात शेंगदाणे पडल्याशिवाय त्या पदार्थाला चव येत नाही. परिणामी, शेंगदाणे हमखास टाकले जातात.

- यामुळेच शेंगदाण्याचे दर चढले असून, १६० रुपये किलो दराने शेंगदाणे विक्री केले जात आहे. शेंगदाणेही नागपूर येथूनच येत असून, त्यांचाही नियमित पुरवठा सुरू आहे.

---------------------------

३) भगरच्या दरात थोडी वाढ

उपवासात साबुदाण्यापासून सर्वाधिक पदार्थ तयार केले जातात. मात्र, कित्येक जण साबुदाण्याचे पदार्थ खात नसल्याने त्यांना भगर एक पर्याय आहे. भगरपासूनही उपवासाचे कित्येक पदार्थ तयार केले जातात. येथील व्यापारी नाशिक येथून भगर मागवत असून, सध्या मागणी वाढल्याने ११० रुपये किलो असलेली भगर आता श्रावणात १२० रुपये किलो दराने विकली जात आहे.

-----------------------

मागणी वाढली

श्रावणात बहुतांश हिंदू धर्मीयांचा उपवास राहत असल्याने, साबुदाणा, शेंगदाणे व भगरचे दर चढले आहेत. तिन्ही वस्तूंचे दर १०-२० रुपयांनी वाढले आहेत, शिवाय या वस्तूंचा साठाही परिपूर्ण आहे.

- अंकित खटवानी, व्यापारी