शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

गटशेतीतून बदलणार जिल्ह्यातील शेतीचे चित्र

By admin | Updated: January 28, 2016 01:42 IST

शेतीकडे दुय्यम व्यवसाय म्हणून बघितले जाते. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

कोदामेडीत कृषी ग्रामसभा : शेतकऱ्यांना देणार ‘स्मार्ट शेती’ करण्याचे तंत्रगोंदिया : शेतीकडे दुय्यम व्यवसाय म्हणून बघितले जाते. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जिल्ह्यात पाण्याची मुबलकता आहे. शेती कशी करावी याचे ज्ञानही आपल्या शेतकऱ्यांना अवगत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता पारंपरिक पद्धतीत बदल करून समृद्ध शेतीचे तंत्र अवलंबवावे, त्यासाठी शेतकऱ्यांना हवे ते मार्गदर्शन दिले जाईल, असे पालकमंत्री राजकुमार बडोले सांगितले.सडक/अर्जुनी तालुक्यातील कोदामेडी येथे राज्यातील पहिल्या कृषी ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, अभिनव फार्मा क्लब पुणेचे प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोडखे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, कोदामेडीच्या सरपंच अनिता बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.पूर्वी कोदामेडी व तिडका परिसरात दुधाचे व भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते. आज मात्र शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. गोंदिया जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून पाणीसुध्दा भरपूर आहे. या पाण्याचे नियोजन करून त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी करावा. शेतकऱ्यांनी आता सामुहिक शेतीचा अवलंब करु न गावागावातून भाजीपाला व दूधाची गाडी बाजारपेठेत गेली पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करावे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तिडका आाणि कोदामेडी या दोन्ही गावांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.जि.प. अध्यक्ष मेंढे म्हणाल्या, शेतीची ग्रामसभा हा अभिनव उपक्र म आहे. ही ग्रामसभा शेतकऱ्यांसाठी जीवनदायी आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ धानाच्या पिकावर अवलंबून न राहता नगदी पिकांची शेती करावी. त्यामुळे त्यांच्या जीवनात समृध्दी येईल. अशाप्रकारच्या शेतीतून अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. शेतीविषयक ग्रामसभेमुळे कृषिविषयक योजना प्रभावीपणे राबविता येतील. शेतीच्या ग्रामसभा जिल्हयात झाल्या तर जिल्हयातील शेतकरी कर्जमुक्त होण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)- शेतमालाला बाजारपेठेची गरजअभिनव फार्माचे बोडखे म्हणाले, शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारा वर्ग आहे. शेतीच्या ग्रामसभेतून गावातील शेतकर्यांना शेतीविषयक योजनांची माहिती मिळेल. त्यामुळे भविष्यात शेतकर्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतीत शेतकरी खूप राबतो, पण मेहनतीच फळ त्याला अल्प मिळते असे सांगून बोडखे म्हणाले, आता शेतीतून किती पैसे कमावतो यालाच महत्व राहणार आहे. जिल्ह्यात पाणी मुबलक आहे. या पाण्याचे नियोजन करु न चांगले पीक घेता येईल. उत्पादित माल थेट बाजारपेठेत विकावा. दलालाचा हस्तक्षेप होणार नाही याकडे लक्ष द्यावे. पृथ्वीवर मनुष्य प्राणी जीवंत आहे. तोपर्यंत जगाला शेतीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. नियोजनबध्द शेती केली तर गावे शेतीतून समृध्द होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज मल्चिंग पेपरचा वापर शेतीत केला तर खुरपणीचा खर्च वाचणार आहे. गावातील शेतकऱ्यांनी आता सामूहिक पध्दतीने शेती करावी. गीर सारख्या देशी गायी घेऊन त्याच्या दुधाची, गोमूत्राची विक्र ी करावी. चांगले शेणखत या गाईपासून मिळणार असल्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. स्मार्ट शेती करण्याची वेळ आता आली असल्याचे त्यांनी सांगितले.