शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित अहवालासाठी रखडली शेतकऱ्यांची मदत

By admin | Updated: December 23, 2016 00:46 IST

शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यावर्षीही खरीप हंगामात पूर, गारपीट व

खरीप हंगामातील नुकसान : यंत्रणेची लालफितशाहीगोंदिया: शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यावर्षीही खरीप हंगामात पूर, गारपीट व अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ६३४.२८ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान होणारा सालेकसा तालुका आहे. त्या पाठोपाठ आमगावचा क्रमांक आहे. देवरी व सडक अर्जुनी या दोन तालुक्यातील नुकसान नगण्य आहे. गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या चार तालुक्यातील एकही नुकसान नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सालेकसा तालुक्यातील ७८४ शेतकऱ्यांचे ४९६.९३ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत ६६ लाख ८४ हजार ४३५ रुपये आहे. आमगाव तालुक्यातील २४८ शेतकऱ्यांचे १२९.९५ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत ८ लाख ८३ हजार ६६० रुपये आहे. देवरी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांचे ३.७० हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत २५ हजार १६० रुपये आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील ११ शेतकऱ्यांचे ३.७० हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत २५ हजार १६० रुपये आहे. या चार तालुक्यातील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या ६३४.२८ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले असून त्याची किमत ७६ लाख १८ हजार ४१५ रुपये आहे. सदर नुकसान जुलै ते नोव्हेंबर या काळातला असून ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणने आहे.(तालुका प्रतिनिधी)