शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, शेतीला समृध्द करा

By admin | Updated: August 18, 2016 00:31 IST

जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

पालकमंत्री बडोले : गंगाझरी येथे जलपूजन कार्यक्र म गोंदिया : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्त अभियानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली असून संरिक्षत सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरीक शेती करण्यापेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला समृध्द करावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गंगाझरी येथे सोमवारी (दि.१५) जलयुक्त शिवार अभियानातून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, माजी आमदार हरीश मोरे, जि.प. सदस्य रमेश अंबुले, पं.स. सदस्य प्रकाश पटले, गंगाझरीच्या सरपंच ममता लिल्हारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर, तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी. मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, पूर्वी आपण पारंपरीक पध्दतीने कडधान्य घेत होतो. पण आज विदेशातून कडधान्याची आयात करण्याची वेळ आली आहे. उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य वापर व त्याची देखभाल ग्रामस्थांनी करावी. पाणी हे जीवन आहे. पाणीसाठा कमी झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाची शेती करावी. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जिल्ह्यात तलाव, जंगल असतानादेखील आता आपण आपल्या मागासलेपणाची ओळख पुसली पाहिजे. अधिकारी व शेतकऱ्यांमधील दुरावा दूर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी व ऐतिहासीक कार्यक्रम आहे. जलयुक्तच्या कामामुळे ९४ पैकी ८० गावांत जास्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. २५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. यावर्षीपासून शेतकऱ्यांनी आता उडीद मुगाचे पीक घ्यावे. उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्याचा उपयोग रबी पिकासाठी करण्यात यावा. यामधून त्यांनी उडीद मुग पिकाची लागवड करावी. पाणीटंचाईपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य रमेश अंबुले, पं.स. सदस्य प्रकाश पटले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी सांगितले, गंगाझरीत जलयुक्तमधून ४० कामे करण्यात आली आहेत. या सिमेंट नाला बंधाऱ्यावर ९ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामधून १८ हेक्टर शेतीच्या सिंचनाला पाण्याची उपलब्धता झाली आहे. गंगाझरी येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामातून २९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे सडक-अर्जुनीच्या भागात धानिपकावर लष्करी अळीचा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून यासाठी औषधाचीही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानात चांगले सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार देवराम भवरीया, सरपंच ममता लिल्हारे, कृषी सहायक आर.एस. तिबुडे, उपविभागीय कृषी अधिकारी एन.बी. नायनवाड, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. वाहणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्र माला गंगाझरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. वाहणे यांनी मानले. (प्रतिनिधी)