शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात कौटुंबिक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2016 02:02 IST

जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचा निपटारा करण्यासाठी आता गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरू होणार आहे.

भाड्याच्या इमारतीचा प्रस्ताव : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन गोंदिया : जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचा निपटारा करण्यासाठी आता गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरू होणार आहे. परंतु इमारतीअभावी हे न्यायालय सुरू होण्याच्या प्रक्रियेला उशिर लागत आहे. उच्च न्यायालयाने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार गोंदियात हे न्यायालय सुरू होणार आहे. गोंदिया कौटुंबिक न्यायालय सुरू करण्यासाठी इमारत उपलब्ध नाही. त्या साठी हे न्यायालय सुरू करण्यासाठी दोन हजार स्केअर फुटच्या इमारतीची गरज असल्यामुळे भाड्याची इमारत जिल्हा न्यायालयाने शोधली आहे. जिल्ह्यात पती-पत्नीचे वाद, पोटगी प्रकरण, घटस्फोट या प्रकरणामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक प्रकरणे लांबणीवर जातात. कौटुंबिक वादाचा निपटारा त्वरीत व्हावा यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयाने गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरू करण्याचे आदेश दिले. इमारतीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मागणी केली आहे. महिला व बाल लैगिक अत्याचाराच्या प्रकरणातही वाढ झाल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय सुरू होणार होते. परंतु काही दिवसापूर्वी जिल्हा न्यायाधीश श्रीमती आनंद यांनी गोंदियात प्रभार स्विकारल्यामुळे त्यांच्याकडे महिलांसंबधी सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)