शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मूर्त्यांना दिला जातोय ‘फायनल टच’

By admin | Updated: September 16, 2015 02:22 IST

मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची लगबग वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.

गोंदिया : मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची लगबग वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्त्यांचे शहरात आगमन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वेळेवर मूर्त्यांचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांचे रात्रीला जागून काम सुरू असून ते मूर्त्यांना ‘फायनल टच’ देताना दिसून येत आहेत. येत्या गुरूवारपासून (दि.१७) गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय. शहरात मोठ्या प्रमाणात खासगी व सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. परिणामी गणरायांचे हे १० दिवस नवचैतन्याने बहरलेले असतात. यामुळेच गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची जिल्हाच काय लगतच्या छत्तीसगड व मध्य् ाप्रदेश राज्यांतही ख्याती आहे. मात्र आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी दिसून व सर्वांना लगबग दिसून येत आहे. शहरातील काही गणेश मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मुर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत असताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे काही मंडळांच्या मुर्त्यां छत्तीसगड राज्यात तयार होतात. त्यामुळे गणेश मंडळ आपल्या मुर्त्या आणण्यासाठी रवाना झाले असून मूर्त्यांचे आगमन सुरू झाले आहे. तर मंडपांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारागिर दिवसरात्र एक करून कामाला लागले आहेत. गणराय येणार असल्याने महिला वर्गही घराच्या साफसफाई व डेकोरेशनला लागले आहे. तसेच गणरायांना १० दिवस कोणता नैवेद्य लावायचा व मोदकांच्या तयारीत व्यस्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सर्व लगबगीत मूर्तिकारही मागे नाही. त्यांनी घेतलेले मूर्त्यांचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार आपल्या परिवारासह डोळ््यात तेल घालून काम करीत आहेत. तर आपल्या मुर्त्यांची तयारी पूर्ण करवून घेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मूर्तिकारांकडे तळ ठोकून बसले आहेत. मूर्तिकारांचे बस्तान सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरात असल्याने हा परिसर गजबजून गेला आहे. (शहर प्रतिनिधी)