शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवा पुरविण्यात सपशेल फेल

By admin | Updated: May 16, 2015 01:18 IST

कालीमाटी : ग्रामीण भागतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उघडण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा पुरविण्यात मात्र सपशेल फेल ठरत आहे.

लोहारा-कालीमाटी : ग्रामीण भागतील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उघडण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा पुरविण्यात मात्र सपशेल फेल ठरत आहे. देवरी तालुक्यातील मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राविषयीचे हे ग्राम पंचायत सदस्यांसह परिसरातील नागरिकांचे मत आहे. देवरी तालुक्यातील मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांर्गत ४७ हजार ६६१ लोकसंख्येचा समावेश आहे. तसेच ११ उपकेंद्र, १८ ग्राम पंचायत, ६८ अंगणवाडी, एक आयुर्वेदिक उपकेंद्र असल्याने तालुक्यातील अतिजबाबदारीचे हे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी लता गायकवाड मागील १८ वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी आरोग्य केंद्राला अद्ययावत केले. मात्र कायम वैद्यकीय अधिकारी नसल्याने सेवेला खीळ बसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉ. देवरी वरून ये-जा करीत असल्याने रात्रीला रुग्णांचा जीव टांगणीवर असतो. त्यात एखादी इमर्जन्सी आल्यास येथील आरोग्य सेविका रूग्णाला देवरी किंवा गोंदिया येथे हलविण्यास प्रवृत्त करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा परिसर अतिसंवेदनशील व दुर्गम असल्याने केंद्रांतर्गत पुराडा व इळूकचुआ येथे मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. पण पुराडा येथील मोबाईल व्हॅन मागील १० महिन्यांपासून नादुरूस्त असून पुराडा येथेच धूळ खात आहे. त्यामुळे येथील गरोदर महिला तसेच इतर रुग्णांना जलदगतीने आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होते. केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रक्ताचे व इतर तपासणीचे नमूने बाहेर पाठविले जाते. त्यामुळे रिपोर्ट यायला विलंब होतो व रुग्णांच्या जीवाचा खेळ खेळल्या जातो. या सर्व समस्यांना घेऊनच काही दिवसांपूर्वी आरोग्य सेवेला घेऊन येथे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात सुविधा मिळत असल्या तरी रात्रीच्या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. येथील आरोग्य केंद्रात वर्षाकाठी ८० ते १०० प्रसूती होतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रात सक्षम एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहे. (वार्ताहर)चार ग्राम पंचायतींनी पाठविला ठराव मुल्ला आरोग्य केंद्रात सक्षम अधिकारी नेमण्यात यावे, यासाठी या क्षेत्रातील ग्राम पंचायतींकडूनही धडपड सुरूच आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फलित आलेच नाही. शेवटी केंद्रांतर्गत असलेल्या चार ग्राम पंचायतींनी या संदर्भात ठराव घेतला आहे. त्या ठरावाची प्रत त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविली आहे. आमदारांकडून वाढल्या अपेक्षा क्षेत्राचे आमदार संजय पुराम हे आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या पुराडा या गावचे आहेत. आता आमदारच जवळचे असल्याने यांच्याकडे आदिवासीबांधव मोठ्या आशेने बघत आहेत. आमदारांना या सर्व बाबींची जाणीव असल्याने आता तरी त्यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रातील समस्यांवर तोडगा निघणार अशी अपेक्षा येथील आदिवासीबांधव बाळगून आहेत. मात्र अपेक्षांची पूर्तता कधी होते याची त्यांना प्रतीक्षा आहे.