गोंदिया : सन २०१४-१५ या वर्षात गोंदिया जिल्ह्याच्या तलावात घेण्यात येणाऱ्या मस्त्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अयोग्य वेळी टाकलेले बीज व कमी पावसामुळे ही घट झाल्याचे सांगितले जाते. परिणामी यावर्षी मासोळ्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. मासोळ्यांचे उत्पादन किती झाले याची माहिती मिळू शकली नाही. परंतु सन २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील तलावात ७.०९ कोटी मत्स्य जीरे (बीज) तयार करण्यात आले. सन २०१३ मध्ये १३.३६ कोटी मत्स्य जीरे तयार केले होते. एका वर्षात ६.२५ कोटी मत्स्य जीरे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे छोटे मासे व मोठे मास्यांचे उत्पादन कमी झाले. या व्यवसायासंदर्भात जुडलेल्या पाच-सहा सहकारी संस्था या व्यवसायापासून दूर राहील्या. विशेष म्हणजे ११ सहकारी संस्था मत्स्य जीरा उत्पादन कामात सक्रिय होत्या. गोंदिया जिल्ह्याची तालावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. या तलावांमध्ये मास्यांचे उत्पादन घेतले जाते. येथील मास्यांची निर्यात देखील केली जाते. मत्स्य जीरे (बीज) करीता गोंदियाच्या तालावात पश्चिम बंगाल च्या हावडा येथील तलावांवर अवलंबून राहावे लागते. छत्तीसगडच्या दुर्ग येथून छोटी मासोळी आयात करावी लागते. जिल्ह्यातील मत्स्य उत्पादक भंडारा, नागपूर, अमरावती व इतर ठिकाणात निर्यात करतात. हळु-हळु मत्स्य व्यवसाय, व्यवसायीक व मत्स्य उत्पादक तालावांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वी मासेमारी करणारे या व्यवसायासोबत जळलेले होते. त्यानंतर त्यांच्या संस्था तयार झाल्या. नंतर खासगी व्यक्तींचे पदार्पण झाले. (तालुका प्रतिनिधी)
मत्स्य व्यवसायात कमालीची घट
By admin | Updated: March 29, 2015 01:47 IST