शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गाव कामगारांच्या विम्याची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

गोंदिया : कोरोना विषाणू प्रादुर्भावाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना ...

गोंदिया : कोरोना विषाणू प्रादुर्भावाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आणि महामारी रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण पातळीवर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती आदी कामे अहोरात्र मेहनत घेऊन केली जातात. त्या ग्रा.पं.कर्मचाऱ्यांंना असलेल्या विमा कवचाची मुदत वाढविण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने केली आहे.

भारत सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अपघात विमा योजने अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ९० दिवसांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याबाबतचा निर्णय ३१ मार्च २०२० रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर घेण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये वेळोवेळी सुधारणा करुन मुदतवाढ सुध्दा देण्यात आली होती. या शासन निर्णयामुळे मागील एक वर्षात कोरोनाच्या आजाराने मृत्यू झालेल्या राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. ५० लाख कोरोना विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ ही होती. या कालावधीतील प्रस्तावाची अंतिम मुदत २४ एप्रिल २०२१ ही होती ती सुद्धा संपलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या २८ एप्रिलच्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेत काम करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच्या विमा कवच योजनेची मुदत २४ मार्च २०२१ नंतर पुढील १८० दिवसासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी जिवाची पर्वा न करता महामारीच्या काळात गेल्या एक वर्षापासून अहोरात्र मेहनत करीत आहे. २४ मार्च २०२१ नंतर कोरोना आजाराने जर कर्मचाऱ्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ देण्यासाठी विमा कवच योजनेची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य संघटक मिलिंद गणवीर, राज्य सचिव निलकंठ ढोके यांनी केली आहे.