शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरले

By admin | Updated: September 17, 2015 02:20 IST

मोरगाव : मुंगलीटोला येथील आंगणवाडी सेविका रोशनी कोल्हे यांचे अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर सेवासमाप्तीचे संकट उद्भवले आहे.

चौकशीत उघड : नियुक्ती वादग्रस्त ठरलीअर्जुनी-मोरगाव : मुंगलीटोला येथील आंगणवाडी सेविका रोशनी कोल्हे यांचे अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर सेवासमाप्तीचे संकट उद्भवले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या चौकशीत हे उघड झाले आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई होत नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचा आरोप कल्पना जांभूळकर यांनी केला आहे. तालुक्यातील मुंगलीटोला या गावासाठी २००६ मध्ये मानधन तत्वावर अंगणवाडी सेविका पदासाठी भरती करण्यात आली. यासाठी ९ महिला उमेदवारांनी अर्ज केले. दस्तावेज व मुलाखतीच्या आधारावर तब्बल ८ वर्षानंतर निवड करण्यात आली. ५ सप्टेंबर २०१४ ला नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सुधारित मुल्यांकन करण्यात आले. यात रोशनी कोल्हे यांना ६४ तर कल्पना जांभूळकर यांना ५६-२५ गुण मिळाले. सर्वाधिक गुण असल्यामुळे रोशनी कोल्हे यांची ३० सप्टेंबर २०१४ रोजी निवड करण्यात आली. रोशनी कोल्हे यांचे माहेरचे नाव माया दादु चाचेरे असे आहे. जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी रोजी अनुभव प्रमाणपत्र तपासणीचे निर्देश सहायक प्रशासन अधिकारी डी.एस. लोहबरे यांना दिले. त्यांनी किरसान मिशन्स स्कूल गोरेगाव येथे जाऊन चौकशी केली. माया चाचेरे यांनी सन २००२ ते २००४ पर्यंत पूर्व प्राथमिक विभागात कार्य केल्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडले होते. चौकशीत हे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अनुभवाचे दिलेले १५ गुण कमी झाल्यास त्यांचे गुणांकन ४९ होते तर कल्पना जांभूळकर यांचे गुणांकन ५६.२५ आहे. त्यामुळे कोल्हे यांची नियुक्ती रद्द करण्याची कार्यवाही जि.प.च्या बाल कल्याण विभागातर्फे सुरू करण्यात आली. यावर कोल्हे यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे पत्र दिले. त्यांनी १० मार्च रोजी स्पष्टीकरण सादर केले. यात अनुभव प्रमाणपत्र अवैध ठरल्याबद्दल उजर तक्रार नसल्याचे म्हटले आहे. मात्र सर्वाधिक गुण असल्यामुळे नियुक्ती कायम ठेवण्यात यावी असे नमूद केले. मार्च महिन्यापासून बाल कल्याण विभागाची ही कार्यवाही सुरू असून सहा महिन्यातही ते अद्याप निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाही. त्यामुळे येथे पाणी मुरत असल्याचा आरोप कल्पना जांभूळकर यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)