शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना सोडून होर्डिंगबाजीवर भर

By admin | Updated: September 1, 2014 23:41 IST

संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घालून आरोग्य व्यवस्थेच्या नाकीनऊ आणले आहे. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य व हिवताप विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र शहराची जबाबदारी

गोंदिया : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घालून आरोग्य व्यवस्थेच्या नाकीनऊ आणले आहे. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य व हिवताप विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र शहराची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेने वेगळीच शक्कल लढवून आपली जबाबदारी चक्क शहरवासीयांवरच ढकलली आहे. पालिका प्रशासन स्वत: करावयाच्या उपाययोजना सोडून शहरवासीयांना डेंग्यू व मलेरियावरील उपायांची माहिती देत स्वत:ची काळजी स्वत:च घेण्याचा सल्ला देत आहे. यासाठी शहरात जागोजागी होंर्डींग्सबाजी केली जात असल्याचे दिसून येत आहे.डासांपासून पसरणारे आजार जीवघेणे ठरत आहेत. त्यात जिल्हा सध्या डेंग्यू व मलेरियाच्या विळख्यात आल्याचे चित्र आहे. झपाट्याने पसरलेल्या या डासांच्या आजारांवरून आरोग्य व हिवताप विभाग किती तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडत आहे याची प्रचिती येते. ग्रामीण विभागात हिवताप विभाग स्वत: उपाययोजना करते. तर शहराची जबाबदारी मात्र नगर पालिकेकडे असते. यामुळे डासांवर उपाययोजना करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. विशेष म्हणजे शहरातही डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळून येत आहे. यातून पालिका प्रशासनाची कर्तव्यतत्परता उघडकीस येते. अशा परिस्थितीत पालिकेने कंबर कसून आलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी लढण्याची गरज आहे. मात्र पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व सदस्य फक्त बांधकाम विभागापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते. अशा या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पालिके कडे साहित्याचा अभाव आहे. मात्र हे सर्व बोलून दाखविणे शक्य नसल्याने यावर पालिकेने नवी शक्कल लढविली आहे. त्याचे असे की, आपली जबाबदारी पार पाडण्यास सपशेल अपयशी ठरत असलेल्या पालिकेने आता शहरवासीयांवरच जबाबदारीचे खापर फोडले आहे. यासाठी पालिकेने एक केविलवाना प्रयोग केला आहे. पालिकेने शहरात जागोजागी डेंग्यू व मलेरियाबाबत माहिती, त्यावरील उपचार, लक्षणे व घ्यावयाची काळजी आदी महिती असलेले फलक लावले आहेत. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास शासकीय रूग्णालयात जाण्याचा अतिमहत्वाचा सल्लाही होर्डीग्समधून देण्यास पालिका प्रशासन विसरलेले नाही. या होर्डीग्सबाजीवर करण्यात आलेल्या खर्चाच्या रकमेतून फवारणी व कीटकनाशक टाकण्यासारखे काम जोमाने करण्याची गरज होती. पालिकेकडे एकच फॉगिंग मशिन असल्याने आणखी मशीन खरेदी करण्याची गरज होती. मात्र हे सर्व उपाय करण्याचे सोडून पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी होर्डीग्सला प्राधान्य दिले. यातून येथील पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व सदस्य शहरवासीयांचे किती हित जोपासत आहेत याची प्रचिती येते. (शहर प्रतिनिधी)