शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीला वेग

By admin | Updated: May 29, 2015 01:25 IST

गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत.

गोंदिया : गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. मालगुजार लोकांनी श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुमारे सहा हजार तलावांचे बांधकाम केले. यात कोहळी जातीचा विशेष सहभाग होता. परंतु कालांतराने त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले. मात्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे या तलावांमधून मागील तीन वर्षांपासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.माजी मालगुजारी तलावांपासून महसूल मिळत नसल्याने शासन त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे या तलावांचे रपटे जीर्ण होवून सिंचन क्षमता कमी होवू लागली. ही बाब प्रफुल्ल पटेल मंत्री असताना तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर तत्कालीन आघाडी सरकारने मामा तलावांच्या विशेष दुरूस्तीसाठी यांत्रिकी विभागातील लिपर शेलरद्वारे या तलावांचे गाळ काढण्याचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. तत्कालीन सरकारने विशेष दुरूस्तीसाठी राज्य शासन १० टक्के व केंद्र शासनाने ९० टक्के निधी देवून काम सुरू केले. काही तलावांचा गाळ काढण्यात आल्याने त्यांची सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांच्या शेताला अधिक पाणी मिळत आहे. यात काही तलावांचे काम सुरू असून काही तलावांच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाल्याने तत्कालीन आघाडी सरकार व खा.प्रफुल्ल पटेल यांचे शेतकऱ्यांनी आभार मानल असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे अध्यक्ष जीवन लंजे यांनी कळविले.कोसबी तलावाचे ५६.४९ लाख रूपयांच्या खर्चातून गाळ काढणे व विशेष दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. चिरचाडी येथे ४२.५३ लाख रूपयांच्या खर्चातून गाळ काढणे व विशेष दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. माहुली व खैरी तलावांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर बोपाबोडी व पळसगाव-राका येथील तलावांच्या विशेष दुरूस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच कोसमतोंडी, खाडीपार, सौंदड, मालीजुंगा, पुतळी व खोडशिवनी येथील तलावांच्या विशेष दुरूस्तीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ही कामेसुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल, मनोहर चंद्रिकापुरे, जीवन लंजे, गजानन परशुरामकर, मुकेश अग्रवाल, अविनाश काशिवार, रूपविलास कुरसुंगे, किरण गावराने, मुन्ना मरस्कोल्हे, नरेश भेंडारकर, मोहन खोटेले, देवराम डोये, भानुदास डोये, मधू हर्षे, चिंतामन ब्राह्मणकर, शिवाजी गहाणे, गंगाधर परशुरामकर, युवराज वालदे, सुभाष कापगते, मिलनदास राऊत, आत्माराम कापगते, कृष्णा ठलाल, चंद्रकांत बहेकार, डॉ. वाढई, भोला कापगते, के.बी. परशुरामकर, अशोक लंजे, उषा मुनेश्वर, ईश्वर लंजे, भागवत कापगते आदी प्रयत्नशील असून कार्यकारी अभियंता सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)