शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

आजच्या काळातही ‘इमानदारी’ कायम

By admin | Updated: July 6, 2017 02:11 IST

आजच्या काळात भ्रष्टाचार व बेईमानी फोफावली असतानाच रेल्वे गाडीत दागिने व रोख रकम असलेली बॅग मिळालेल्या इसमाने

लोकमत न्यूज नेटवर्क मुंडीकोटा : आजच्या काळात भ्रष्टाचार व बेईमानी फोफावली असतानाच रेल्वे गाडीत दागिने व रोख रकम असलेली बॅग मिळालेल्या इसमाने बॅगमधील मोबाईलने संपर्क साधून ज्यांची बॅग त्यांना परत केली. या घटनेवरून आजही ‘इमानदारी’ कायम असल्याचा प्रत्यय येतो. मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँक शाखेत अविंद्र सुखदेव भावे हे रोखपाल या पदावर कार्यरत आहेत. ते गोंदिया-मुंडीकोटा दुर्ग लोकल गाडीने नेहमीच प्रवास करतात. याच गाडीतून आमगावावरुन काही महिला बालाघाट (मध्य प्रदेश) येथे जाण्याकरिता या गाडीत बसल्या होत्या. त्या गोंदिया स्थानकामध्ये उतरून लगेच बालाघाट गाडी पकडण्याकरिता बालाघाट गाडी लागलेल्या प्लॅटफार्मवर गेल्यात. पण त्यांची बॅग दुर्ग-इतवारी या पॅसेंजर गाडीच्या बोगीत विसरली होती. त्याच बोगीत भावे मुंडीकोटाला येण्यासाठी चढले असताना त्यांना त्या महिलांची विसरलेली बॅग मिळाली. त्या बॅगमध्ये रुपये व सोन्याचे दागिने होते. भावे यांनी बॅगमध्ये असलेल्या मोबाईलवरुन त्यांच्या नातलगांना फोन केला. त्यामुळे त्यांचे नातेवाईक मुंडीकोटा आयडीबीआय बँकेत आलेत. त्यावेळी मिळालेली बँग त्यांना देण्यात आली. या घटनेवरून आजही खरेपणा कायम असल्याचे दिसून येते. भावे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून बॅग परत केली. त्यामुळे भावे यांचे कौतुक होत आहे.