शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळातही पथदिवे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे ...

केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे वीज बिल संबंधीत ग्रामपंचायतीने भरावे, म्हणून फतवा काढला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह येथील पथदिवे सणासुदीच्या काळातही बंदच आहेत. परिणामी गावकऱ्यांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पोळा नुकताच गेला. लगेच गावा-गावात गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे. परंतु अजूनही येथील पथदिवे बंदच आहेत. यावर ग्रामपंचायत सरपंच संघटना काय निर्णय घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषद भरत होती. परंतु अलीकडे वीज वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांच्या बिलाची नोटीस ग्रामपंचायतीला बजावून बिलाची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे.

वीज वितरण कंपनीने पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याची नोटीस देऊन २ महिन्यांपूर्वी वीज जोडणी कापली. १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे बिल ग्रामपंचायतीने भरावे, असे शासनाने आदेश काढले आहेत. परंतु हा निधी ग्रामपंचायतीने इतर विकास कामात खर्ची घालण्याचे नियोजन केल्यामुळे पथदिव्यांचे बिल कसे भरावे? अशा विवंचनेत ग्रामपंचायत सापडली आहे. पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावे, या मागणीला घेऊन तालुका सरपंच संघटनेने पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे कैफियत मांडली. परंतु अजूनही पथदिव्यांच्या बिलाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळातही केशोरीवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

-------------------------

कोट

कोरोना संक्रमण काळात ग्रामपंचायती अधिकच अडचणीत आल्या आहेत. करवसुलीचे प्रमाण सुद्धा घटले आहे. नियोजित गाव विकासाच्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा.

- नंदू पाटील गहाणे

सरपंच, केशोरी