शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या नुकसानीचा अंदाज

By admin | Updated: December 23, 2016 00:25 IST

गोंदियाच्या हॉटेल बिंदलला लागलेल्या आगीनंतर या घटनेची कारणमिमांसा शोधण्याच्या कामी प्रशासकीय

दिवसभर सुरु होता पंचनामा : रात्रीपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल नाही गोंदिया : गोंदियाच्या हॉटेल बिंदलला लागलेल्या आगीनंतर या घटनेची कारणमिमांसा शोधण्याच्या कामी प्रशासकीय यंत्रणा लागली आहे. गुरूवारी दिवसभर सहायक निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यात अनेक गोष्टी समोर आल्या. दरम्यान या आगीत एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गुरूवारी दिवसभर अनेक लोकांनी गोरेलाल चौकात येऊन जळालेल्या हॉटेलची पाहणी केली. चौकात दिवसभर लोकांची गर्दी होती. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक खोळंबत होती. सायंकाळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी हॉटेलची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, सहायक पो.अधीक्षक संदीप पखाले, दोन्ही एसडीपीओ आणि शहर ठाण्याचे निरीक्षक दिनेश शुक्ला उपस्थित होते. या घटनेमागे कोणता घातपात तर नाही ना? या शंकेची त्यांनी चाचपणी केली. दरम्यान विविध यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालानंतर या घटनेत कोणाचा दोष आहे हे निश्चित होईल असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत कोणावही गुन्हा दाखल झाला नव्हता. (जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण हॉटेलमध्ये दोनच अग्निशमन बंब ४या हॉटेलमध्ये केवळ दोन अग्निशमन बंब भिंतीला टांगून असल्याचे पोलिसांना आढळले. याशिवाय दुसरी कोणतीही व्यवस्था तिथे नव्हती. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापनाने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे समोर आले. ४जळालेल्या झी महासेलमध्ये चार सिलींडर फाटलेले तर हॉटेल बिंदलमध्ये २ सिलींडर फाटलेले आढळले. पोलिसांनी चारही मजल्यावर पंचनामा केला. संपूर्ण इमारत जळून खाक झाल्यामुळे ही इमारत पुन्हा वापरता येणार किंवा नाही याचीही तपासणी करावी लागणार आहे. पालकमंत्र्यांनी केली सांत्वना ४बिंदल प्लाझा या हॉटेलच्या आगीत सात व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात इमारतीत असलेल्या विविध दुकानातील वस्तु व साहित्य जळून खाक झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसानही झाले. या दुर्घटनास्थळाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. मृतकांच्या नातेवाईकांच्या घरी सुध्दा पालकमंत्र्यांीन भेट देवून सांत्वन केले. त्यात प्रामुख्याने ज्या घरचे जावई या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले त्या अजमेरा परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदतही जाहीर केली. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते. ४पालकमंत्र्यांनी या घटनेनंतर फायर आॅडिट करण्याचे सूचविले होते. त्यादृष्टीने फायर आॅडिट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोंदियात अनेक इमारती नियमबाह्य आहे. त्यांच्याकडे परवानगी नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हॉटेल बिंदल हेसुद्धा एका भाजप पदाधिकाऱ्याच्या पुतण्याचे आहे. त्यामुळे कारवाई होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे. अजमेरा परिवाराला भेट देऊन त्यांचे सांत्वन करताना पालकमंत्री बडोले, सोबत इतर स्थानिक पदाधिकारी.