शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७२६ गावांत सार्वजनिक गणपतीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे स्वागत शुक्रवारी (दि. १०) वाजत-गाजत करण्यात आले. यंदा जिल्ह्यात ७२६ ठिकाणी सार्वजनिक, ...

गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे स्वागत शुक्रवारी (दि. १०) वाजत-गाजत करण्यात आले. यंदा जिल्ह्यात ७२६ ठिकाणी सार्वजनिक, तर ५२६७ घरांत गणपतीची स्थापना केली आहे.

गणरायाचे आगमन होणार असल्याने सकाळपासूनच मूर्तिकारांकडे नागरिकांची गर्दी दिसून आली, तर काहींनी गुरुवारी रात्रीच आपल्या बाप्पाला घरी नेल्याचेही दिसले. साक्षात गणपती येणार असल्याने हे १० दिवस नवचैतन्याने भारलेले असतात. विशेष म्हणजे, घरातील चिमुकल्यांना बाप्पाचे जास्त आकर्षण राहत असल्याने त्यांचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे त्यांची सकाळपासूनच धूम दिसून आली, तर दुसरीकडे बाप्पा येणार असल्यामुळे बाप्पाच्या पूजेच्या व नैवेद्याच्या तयारीची लगबग महिलांमध्ये सुरू असल्याचे दिसून आले. बाप्पाचे लाडके मोदक तयार करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू होती.

गणेशोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी राहायची. परंतु कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गर्दी नाही, तर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व तोंडाला मास्क लावणे आवश्यक राहणार आहे. आरतीची जबाबदारी मोजक्याच कार्यकर्त्यांवर देऊन तेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतील, असे ठरविण्यात आले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत.

------------------------

चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त

गणपती उत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून चौका-चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. याशिवाय दंगल नियंत्रक तीन पथके, चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकिंग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकिंग फोर्स सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोधक, नाशक पथकही नेमण्यात आले आहे. शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना नियमावली समजावून सांगितली आहे. त्यातही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावयाची असून मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचे नियम सर्वांना पाळावे लागणार आहेत.

..................

असे राहणार ‘एक गाव-एक गणपती’

गोंदिया शहरात २, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत २२, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ३१, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ३९, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत १८, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ९, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत २९, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३१, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत १६, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत ३४, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ४६, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ४४, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत २२, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३९, तर केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत २२ गावांत एकाच गणपतीची स्थापना केली जाणार आहे.