शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

प्रत्येक रस्त्यावर पळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:30 IST

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा वनांचा जिल्हा म्हणून नावाजलेला असलेला असला तरी पशू-पक्ष्यांचे जीवन ज्या झाडांवर अवलंबून आहे त्या झाडांची लागवड करण्यात गोंदिया जिल्हा सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो पक्ष्यांचे जीवन फुलविणाऱ्या पळसाने निसर्गाचे सौंदर्य फुलविले. २५ वर्षापूर्वी लावलेला पळस आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे. सन ...

ठळक मुद्देपळसाने रंगविले रस्ते : परदेशी झाडे लावण्याचा ट्रेंड बदलवा

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा वनांचा जिल्हा म्हणून नावाजलेला असलेला असला तरी पशू-पक्ष्यांचे जीवन ज्या झाडांवर अवलंबून आहे त्या झाडांची लागवड करण्यात गोंदिया जिल्हा सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो पक्ष्यांचे जीवन फुलविणाऱ्या पळसाने निसर्गाचे सौंदर्य फुलविले. २५ वर्षापूर्वी लावलेला पळस आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे. सन २०१८ च्या पावसाळ्यात गोंदिया जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य फुलविणाऱ्या पळसाच्या रोपट्यांचीच प्रत्येक रस्त्यावर लागवड करण्याचा आग्रह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा आहे. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावरून भ्रमण केल्यास प्रत्येकक रस्त्यांवर पळसाची झाडे फुलांनी बहलेली दिसतात. ह्या निसर्ग सृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या शहरातील लोक जिल्ह्यात येतात. गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सकाळी ६ वाजता पासून सायंकाळी ६ वाजता पर्यनत तब्बल १२ तास भ्रमंती करून ४० ते ५० ठिकाणचे फोटो काढलेत. एकाच ठिकाणातून ५ ते १० फोटो काढून गोंदिया जिल्ह्यातील निसर्गाचे सौंदर्य पळस कसे फुलवितो याची पाहणी केली. हे वातावरण १५ मार्च पर्यंत असेच असेल. पण जो पळस मानवी डोळ्यांना लोभदायी रंगाचा आनंद देतो, तोच पळस इथल्या लाखो पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव वाचवतो आहे. फुललेल्या एकेका पळसाच्या झाडावर शेकडोच्या संख्येने पक्षी बसलेले दिसतात. १५ ते २० माकडांची टोळी महिनाभर आरामात पळसावर गुजराण करते.२५ वर्षात पळसाची लागवड नाहीमागील २५ वर्षात गोंदिया जिल्ह्यात नव्याने पळस लावलेला नाही. उलट पळसाची झाडे तोडून परदेशी वृक्ष लागवड झाल्याचे गोंदियात ठायीठायी दिसत आहे. सर्व निसर्गप्रेमींनी हा ट्रेंड बदलविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पळसाचे निमित्ताने ही जीवसृष्ट ीमहाराष्ट्र भरभरून वाढीला लागेल यासाठी पळसाची लागवड २०१८ च्या पावसाळ्यात लावण्याचा माणस जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा आहे.६८४७ वृक्षांचे संरक्षणजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पुरातन वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीने नाविण्यपूर्ण योजनेतून सन २०१६-१७ या वर्षापासून २५० सेमी गोलाईच्या ६ हजार ८४७ वृक्षांचे संरक्षण करण्यात आले. यापैकी २ हजार ४० वृक्षांना २० लाख ४० हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना देण्यात आली. सन २०१७-१८ या वर्षात १०० से.मी. ते १५० से.मी., १५० से.मी. २०० से.मी., २०० से.मी. ते २५० से.मी. व २५० से.मी. ते ३०० से.मी. गोलाई असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण करुन या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.