शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

गोंदिया स्थानकावर एस्कलेटर व लिफ्ट

By admin | Updated: December 24, 2014 23:01 IST

गोंदिया रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले. तीन प्लॅटफार्मवरून आता विविध गाड्यांच्या थांब्यासाठी एकूण सात प्लॅटफार्म तयार झाले असले तरी एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर

नववर्षाची भेट : सहा महिन्यात वृध्द व अपंगासाठी सुविधा मिळणार देवानंद शहारे - गोंदियागोंदिया रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले. तीन प्लॅटफार्मवरून आता विविध गाड्यांच्या थांब्यासाठी एकूण सात प्लॅटफार्म तयार झाले असले तरी एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी अपंग व वृद्ध व्यक्तींसाठी कोणतीही सोयी नाही. ही बाब लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने आता गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटर (स्वयंचलित पायऱ्या) व लिफ्टची सुविधा करण्याचे नियोजन केले आहे. याचे काम नवीन वर्षात, अर्थात जानेवारी २०१५ पासून सुरू करण्यात येणार आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे स्थानकापर्यंत सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदिया स्थानकाची ओळख आहे. दरदिवशी या स्थानकावरून ६० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या जातात. दरदिवशी जवळपास १९ ते २० हजार प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी जातात, तर एवढेच प्रवासी दररोज उतरतात. मात्र या रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सुविधा मिळू शकल्या नव्हत्या. दोन वर्षांपूर्वी वृद्ध व अपंगांसाठी एस्कलेटरची सोय करण्यात येईल, असे रेल्वेचे अरूणेंद्रकुमार बोलले होते. या गोष्टीला दोन वर्षांचा कालावधी लोटूनही त्या कामाचा शुभारंभ होवू शकला नव्हता. त्यामुळे वृद्ध व अपंगांना पायऱ्या चढून प्लॅटफार्म जाण्यासाठी किंवा प्लॅटफार्मवरून बाहेर निघण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. आता ही सुविधा अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत उपलब्ध होणार आहे.एस्कलेटर व लिफ्टसाठी गोंदिया रेल्वे स्थानकाचे निरीक्षण पूर्ण झाले आहे. त्याचे ड्रार्इंग व डिझाईन तयार करून रेल्वे मुख्यालयाला पाठविण्यात आले आहे. त्या संदर्भात निविदेचेसुद्धा काम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात या कामाला सुरूवात होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हे काम पूर्णत्वास जाण्यास जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफार्म, प्लॅटफार्म-३ व ४ अशा तीन फलाटांवर एस्कलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लिफ्टची सुविधा सध्या एकाच प्लॅटफार्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अपंग व वृद्धांना सध्या करावी लागणारी कसरत संपुष्टात येईल.