शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आरती इन्फ्रास्ट्रक्चरचे वनजमिनीवर अतिक्रमण

By admin | Updated: August 27, 2015 02:03 IST

वनविभागाच्या परवनागीशिवाय टिचभरही वनजमीन वापरता येत नाही, परंतु कोहमारा-नवेगाव रस्त्याला लागून

विनापरवाना साहित्य टाकले : वीज कंपनीकडून दिली थ्री फेज मीटर जोडणीगोंदिया : वनविभागाच्या परवनागीशिवाय टिचभरही वनजमीन वापरता येत नाही, परंतु कोहमारा-नवेगाव रस्त्याला लागून असलेल्या वनविभागाच्या जागेवर वीज वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशनच्या उभारणीसाठी नागपूरच्या आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने नियमबाह्यरित्या हे अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कोहमारा-नवेगाव रस्त्यावरील गट क्र. २८०, १६ वर आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वीज कंपनीसाठी पॉवर हाऊस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आणले आहेत. एवढेच नाही तर कंपनीने या गटाच्या जागेवर तारांचे कुंपन केले आहे. विटा सिंमेंटच्या पक्क्या खोल्या तयार केल्या आहेत. ६० हजार चौरस फुट वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून त्या ठिकाणी साहित्य आणून ठेवण्यात आले आहे. वनविभागाची जमीन वापरताना वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. वनविभागाची परवानगी नसताना वीज कंपनीने आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नागपूरला औद्योगिक वापरासाठी तीन फेजची लाईन दिली आहे. या कामासाठी खोटे दस्तावेज जोडण्यात आले असावे अशी शंका घेतली जात आहे. महावितरण कंपनी मालकीच्या जागेचा सातबारा देऊनही शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देत नाही, उलट सातबारा नसलेल्या ठिकाणी आणि अतिक्रमित जागेवर तीन फेज लाईन कशी देण्यात आली हे न उलगडणारे कोडे आहे. याची साधी चौकशी करण्याचे सौजन्य विद्युत वितरण कंपनीने दाखविले नाही. आदिवासी वनहक्क समितीअंतर्गत दावा मंजूर केल्यानंतर आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला भाडे तत्वावर ही जागा दिली असेल तर त्या शेतकऱ्याने नियोजनबध्द पध्दतीने भूमीअधिग्रहण केल्याचे सिध्द होते. ज्या व्यक्तीला ही जमीन दिली असेल आणि ती व्यक्ती दुसऱ्याला ती जागा भाडेतत्वावर देत असेल तर त्या व्यक्तीला त्या जमिनीची गरज नाही असा त्याचा अर्थ होतो. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या जमीनीचा उद्योगासाठी वापर करता येत नसताना हा प्रकार सर्रास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)