शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

नियोजनशून्यतेमुळे विद्यार्जन धोक्यात

By admin | Updated: July 30, 2015 01:32 IST

सडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या.

वर्गखोल्यांमध्ये गळती : संगणक झाले उंदरांचे घर, शालेय गुणवत्तेबाबत शिक्षकांसह अधिकारीही उदासीनवाताहत शिक्षणाचीराजेश मुनिश्वर सडक अर्जुनीसडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील कनेरी/राम, धानोरी, सौंदड, डुग्गीपार आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी टपकत आहे. त्यामुळे वर्गात चांगले बसणेच शक्य नाही तर विद्यार्जन कसे करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.चार वर्षापूर्वी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कनेरी येथे षटकोणी वर्गखोली बांधण्यात आली. ती वर्गखोली पावसाळ्यात नेहमीच गळत असते. त्यामुळे टपकणाऱ्या पाण्यापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना बेंच सरकवून बसावे लागते. टपकलेल्या पाण्याचे डबके वर्गखोलीतून साचून त्याचे लोट वाहताना दिसत आहेत. ओल्याचिंब वर्गखोलीत बसून विद्याग्रहण करताना मुलांची तारेवरची कसरत होत आहे. यातूनच अनेक जण आजारी पडत आहेत.काही शाळेत नवीन वर्गखोल्या नसल्यामुळे धोकादायक असलेल्या शाळा इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसत आहेत. कवेलूची इमारत आहे. त्याचा लोखंडी खांब सडल्याने छताला मोठे भगदाड पडले आहे. त्याच जुन्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्या भेगांमधून पावसाळ्यात सापासारखे विषारी सरपटणारे प्राणी कधीही आत येऊ शकतात. यातून एखादी अप्रिय घटना घडली तर जबबादार कोण? असा प्रश्न निर्माण होतो.पोषण आहाराचे गौडबंगालसडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ११७ आहेत. जिल्हा परिषद हायस्कुल सौंदड, सडक अर्जुनी या ठिकाणी आहेत. शासकीय आश्रमशाळा शेंडा येथे आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पण आहारात महिन्यातून एकदा तरी अंडी दिली पाहिजे असे नियमावरील नमूद असताना ती प्रत्यक्षात दिलीच जात नाही. बिलात मात्र अंडी दिल्याचे नमूद करून बोगस बिले जोडली जातात. पंचायत समितीचा एक जबाबदार अधिकारी तर केवळ बांधकाम सुरू असलेल्या शाळांनाच भेटी देत आहे. मात्र शालेय गुणवत्तेविषयी साधी विचारपूसही करीत नसल्याची खमंग चर्चा सुरू आहे. ‘जिथे बांधकाम तिथेच भेटी’ असे समीकरण सुरू आहे.शौचालयांची दुरवस्थातालुक्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये शौचालयाची सुविधा केली आहे. पण शिक्षकांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक शौचालय निकामी पडल्याचे दिसत आहे. शौचालयाकडे जाण्याच्या मार्गावर गवताचे कुरण वाढल्याने मुलांना तिथे जाताच येत नाही. काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे मुले बाहेरच जाणे जास्त पसंत करतात. या गंभीर बाबीकडे मुख्याध्यापकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील संगणक वाऱ्यावरतालुक्यातील २८ ते ३० शाळांमध्ये शासनाच्या माध्यमातून संगणकाचा पुरवठा करण्यात आला. पण मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ढिसाळ नियोजनामुळे बहुतेक संच आता उंदरांचे घर बनले आहे. योजना चांगल्या असतात, पण राबविणारी यंत्रणा बरोबर नसली म्हणजे त्या योजनेचे कसे तीनतेरा वाजतात याचे उत्कृष्ट उदाहरण येथे पहायला मिळते. अनेक ठिकाणी तर शासनाने संगणक दिले पण विजेची सोय केली नाही. संगणक दिलेल्या सर्वच शाळांना मोफत वीज पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे.शैक्षणिक गुणवत्तेची फिकीर कोणाला?तालुक्याच्या शिक्षण विभागात आता चांगलाच खेडखंडोबा होत आहे. दुपारच्या शाळेला चक्क ११.३० वाजता शाळेत जाणारे आणि ४ वाजता परत गावाकडे निघून जाणारे शिक्षक कमी नाहीत. बहुतेक शिक्षक तर भंडारा, लाखणी, साकोली, गोंदिया, देवरी, अर्जुनी मोरगाववरुन ये-जा करताना दिसतात. सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा या बस स्थानकावर शिक्षक प्रवाशांची गर्र्दी वाढताना दिसते. या अप-डाऊनमुळे खरेच मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.