शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

महाराष्ट्र शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने मंगळवारी (दि.२६) काळ््या फिती लावून काम केले.

गोंदिया : महाराष्ट्र शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने मंगळवारी (दि.२६) काळ््या फिती लावून काम केले. तसेच द्वारसभेच्या माध्यमातून कृती समितीने निषेध नोंदवित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवाज उठविला. राज्यात उर्जाक्षेत्रात कार्यरत महावितरण कं पनीने विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अशा चार प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण राज्याचे उर्जामंत्री यांनी नुकतेच जाहीर केले. याचा विरोध वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने राज्य शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाला पत्र पाठवून केला आहे. त्यानुसार शासन व व्यवस्थापनाने संघटनेशी चर्चा करणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता उलट सन २०११ मध्ये ठरविण्यात आलेल्या अटींची मोडतोड करून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार केले जात आहेत. यामुळेही वीज कर्मचाऱ्यांत रोष व्याप्त आहे. याकरिता प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण मागे घ्यावे, फिडर फ्रेंचाईसी विषयावर संघटनांशी चर्चा करावी व कमर्शियल परिपत्रक क्रमांक २३८ ची अंंमलबजावणी थांबवावी, तिनही कंपन्यांतील बदली धोरण संघटनांशी चर्चा करून ठरवावे, मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार पुर्वीप्रमाणे कायम पदावर नेमणूक द्यावी, सामान्य आदेश ७४ च्या तृतीय लाभासाठी रोजंदारी कामगारांची सेवा जेष्ठता ग्राह्य धरावी, तिनही कंपन्यांसाठी स्टाफ नॉर्मस्, सेटअप, कंझूमर नॉर्मस् ठरवावे, पारेषण कंपनीच्या व्यवस्थापना बरोबर झालेल्या चर्चेनुसार रिक्त जागा भराव्यात व पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. सर्व वीज सेवकांना मेडिक्लेम योजना लागू करावी तसेच १७ मे रोजी कृती समितीच्या पत्रात नमूद मागण्या व प्रश्नांवर वाटाघाटी करून निर्णय घेण्यात यावा या मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.२६) काळी फित लावून काम केले. येत्या २६ व २८ तारखेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे हे विशेष. मंगळवारी घेण्यात आलेल्या द्वारसभेला येथील हरीश डायरे, योगेश्वर सोनुले, विवेक काक डे, राजू गोंधरे, आनंद जैन, सुमित पांडे, प्रशांत वडसकर, विनय नेवारे, अनूप ढोके, चंद्रभान वाघ, धनराज शेंडे, मंगेश माडीवाले, राजू शालमाके, पी.पी. पिंपरामुळे, सौरभ गौरीवार, हिरेन मस्के, गणेश चव्हाण, पीयूष गोसेवाडे, निलम मेश्राम, अमय परसोकर, विवेक मते, विजय चौधरी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)... अन्यथा ५ जूनपासून कामबंद आंदोलन शासन व व्यवस्थापनाच्या धोरणा विरोधात वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आंदोलन छेडले आहे. तर आता तीन दिवसीय आंदोलनातून कृती समिती आपला रोष व्यक्त करणार आहे. या आंदोलना नंतर चर्चा होऊन सन्माननीय तोडगा निघणे अपेक्षीत आहे. मात्र असे न झाल्यास येत्या ५ जून पासून कोणतीही पूर्व सूचना न देता कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.