शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अटकेच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: August 26, 2015 01:42 IST

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या किशोर उपरीकर या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांना अटक करावी या मागणीला ..

दाखल्यांसाठी नागरिकांच्या येरझाऱ्या : संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा भंडारा : नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या किशोर उपरीकर या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांना अटक करावी या मागणीला घेऊन शुक्रवारपासून सुरु असलेले काम बंद आंदोलन आज सोमवारीही यथावत होते. परिणामी दाखल्यांसह कामांसाठी येणाऱ्या नगरपरिषद कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन्ही गटातून भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाण प्रकरणी भगवान बावनकर यांना अटक करावी अशी एकमुखी मागणी कॉस्ट्राईब नगरपरिषद संघटनेने केली आहे. जोपर्यंत बावनकर यांना अटक होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहील असा फतवाही संघटनेने काढला आहे. या निर्णयाने जनसामान्यांची कामे रखडली आहेत. दुसरीकडे अतिक्रमण निर्मूलनात सहकारनगर येथील एका महिलेच्या तक्रारीवरूनही भंडारा पोलिसांनी किशोर उपरीकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर उपरीकर यांनी म्हटले आहे की सदर तक्रार महिलेने दबावापोटी दिली असून धादांत खोटी आहे. महिलेला कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की किंवा अनुचित प्र्रकार घडलेला नाही. परिणामी राजकीय द्वेशातून माझ्यावर आसूड ओढावला जात आहे असेही उपरीकर यांचे म्हणणे आहे. या दरम्यान नगरपरिषद कर्मचारी संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात बावनकर यांना अटक करण्यात आली नाही तर विदर्भातील नगरपरिषद कर्मचारी संघटना आंदोलनात सहभागी होतील असेही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. दरम्यान शुक्रवारी घटना घडल्यावर त्या दिवशीही नगरपालिकेत कुठलेही कामकाज झाले नाही. (प्रतिनिधी)