शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया नागरी सहकारी संस्थेत चार कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

गोंदिया : येथील गोंदिया नागरी सहकारी संस्थेतील ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ८५ रुपयांच्या अपहार प्रकरणानंतर फरार असलेल्या ...

गोंदिया : येथील गोंदिया नागरी सहकारी संस्थेतील ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ८५ रुपयांच्या अपहार प्रकरणानंतर फरार असलेल्या संस्थासचिवाला पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत १२ जून २०१९ रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

येथील गोंदिया नागरी सहकारी संस्थेत ठेवीदारांनी वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेल्या ‌ठेवींच्या स्वरूपातील रोख ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ८५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. संस्थाध्यक्ष पुरनलाल मोटूराम भाजवानी, उपाध्यक्ष महिनादेवी गोविंदराम लोगानी, सचिव सागर रामचंद्र गलानी व इतर ९ संचालक-व्यवस्थापकांनी संगनमत करून हा घोटाळा केल्याप्रकरणी लेखापरीक्षक फिर्यादी अनिरुद्ध प्रभाकर जोशी (वय ४९) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत १२ जून २०१९ रोजी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७२, २०१, ४०६, १२० (ब) सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणेबाबत अधिनियम- १९९९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत होती. या तपासादरम्यान, अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थासचिव सागर गलानी (वय ३९,रा.आदर्श कॉलनी) यास पोलिसांनी १६ जानेवारी रोजी अटक केली. त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

------------------------

कागदपत्रे जमा करून जबाब नोंदवा

या संस्थेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींच्या मागणीबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे विहित नमुन्यात अर्ज केले आहे. मात्र, ज्यांनी पासबुक, आधारकार्ड, ठेवींचे प्रमाणपत्र, बॉंड व संबंधित इतर कागदपत्रे जमा केले नाही, अशांनी आर्थिक गुन्हे शाखेत संबंधित कागदपत्रे जमा करून आपला जबाब नोंदवावा, असे कळविण्यात आले आहे.