शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या विसाव्यापासून शहरातील वृद्ध वंचित

By admin | Updated: October 1, 2015 02:10 IST

आयुष्याच्या संध्याकाळी एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ती कोणाच्यातरी सोबतीची.

आज ज्येष्ठ नागरिक दिन : ‘फेस्कॉम’च्या पुढाकाराने अनेक सवलतीगोंदिया : आयुष्याच्या संध्याकाळी एकाकीपणा दूर करण्यासोबतच वाट्याला आलेले सुख-दु:ख ‘शेअर’ करण्यासाठी वृद्धांना गरज असते ती कोणाच्यातरी सोबतीची. अशी सोबत करण्यासाठी गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघही कार्यरत आहे. पण त्यांना विसावा घेण्यासाठी, दोन क्षण निवांत बसण्यासाठी हक्काची जागाच नाही. गोंदियातील ज्येष्ठ नागरिक संघ त्यासाठी अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे.ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संघाचे सचिव शांतीलाल दखने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरातील सुभाष गार्डनमध्ये आम्ही एकत्र येत होतो. त्याच ठिकाणी आमच्या बैठकाही होतात. पण दोन वर्षांपासून नगर परिषदेने त्या ठिकाणी क्लब सुरू केला. त्यामुळे आम्हाला हक्काची अशी कोणतीच जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व बैठकीसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी नगर परिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. शहरातील बाई गंगाबाई महिला रूग्णालयामागील २० हजार चौ.फू. जागेतून ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीसाठी जागा मंजूर करण्यात आल्याचे तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले होते. ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने याच ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्याचा मानस होता. पण त्या प्रस्तावाचे नंतर काय झाले कळले नाही.राज्य सरकारने फेडरेशन आॅफ सिनीअर सिटीझन्स आॅर्गनायजेशन महाराष्ट्र (फेस्कॉम) यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गोंदियात ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार करण्याचे काम करीत आहे. हा संघ ज्येष्ठ नागरिकांचे कागदपत्र तपासून त्यानुसार अर्ज व ओळखपत्र तहसीलदारांकडे पाठवितात.