शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

गोंंदिया - कोरोनाच्या सुरुवातीलाच राज्य शासनाने विशेष निर्णय पारित करून राज्यातील प्रत्येकच खासगी रुग्णालयाला प्रत्येक नागरिकाला कोरोना उपचारासाठी महात्मा ...

गोंंदिया - कोरोनाच्या सुरुवातीलाच राज्य शासनाने विशेष निर्णय पारित करून राज्यातील प्रत्येकच खासगी रुग्णालयाला प्रत्येक नागरिकाला कोरोना उपचारासाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत पात्र घोषित केले होते. त्यावरही खासगी रुग्णालयांनी आदेशाचे पालन न करता रुग्णांची लूट केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही मे २०२१ मध्ये याबाबतचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही राज्य शासनाने अद्याप कुठलेही पाऊल उचलले नाही. अशात खासगी रुग्णालयात उपचार करवून घेतलेल्या रूग्णांना जीवनदायी योजनेंतर्गत १.५० लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून केली आहे.

ना. टोपे यांना पाठविलेल्या पत्रात अग्रवाल यांनी, कोरोना महामारीत जेव्हा शासकीय रुग्णालयात जागा नव्हती तेव्हा कोरोनाबाधितांच्या परिवारांनी आपली आर्थिक स्थिती नसतानाही खासगी रुग्णालयात उपचार करविला. तेथेही ऑक्सिजन सिलिंडर व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी काळाबाजार करणाऱ्यांनी या परिवारांकडून लाखो रूपये वसूल केले. यामुळे कित्येक परिवार आज अडचणीत आहेत. करिता या रूग्णांना जीवनदायी योजनेतून लाभ देण्यात यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनस्तरावर संघर्ष करण्याची तयारी अग्रवाल यांनी दर्शविली आहे.

-------------------------------

कागदपत्रांसह जनसंपर्क कार्यालयात संपर्क करा

कोरोना रूग्णांना या योजनेचा लाभ मिळ‌वून देण्यासाठी अग्रवाल यांनी आता प्रयत्न करण्याची तयारी केली असून यासाठी कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाचे बिल, आरटी-पीसीआर रिपोर्ट, रेशनकार्ड, आधारकार्ड झेरॉक्ससह अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क करावा, असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे व शहर अध्यक्ष सुनील केलनका यांनी कळविले आहे.