शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्र मण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:12 IST

घाणेरड्या शहराच्या यादीत गोंदिया शहराचा समावेश आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत.

राजकुमार बडोले : गोंदिया अतिक्र मण आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : घाणेरड्या शहराच्या यादीत गोंदिया शहराचा समावेश आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होवून डासांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. आता गोंदिया हे शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी अतिक्र मण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी (दि.१५) गोंदिया शहरातील अतिक्र मणाबाबतचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी.मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता मडके, ठाणेदार दिनेश शुक्ला व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्र मण वाढल्याचे सांगत नामदार बडोले यांनी, अतिक्र मणामुळे शहरातील बाजारातून फिरणे देखील कठीण झाले आहे. अतिक्र मणधारकांना अतिक्र मण हटविण्याबाबत नोटीस द्याव्यात. कायदयाचे पालन करु न अतिक्र मण हटाव मोहिम सुरु करावी. जे अतिक्र मण काढायचे आहे त्याची मार्कींग करावी. डॉटेड लाईनच्या बाहेरचे अतिक्र मण काढावे. अतिक्र मण काढल्यानंतर पुन्हा अतिक्र मण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. अतिक्र मण हटाव मोहिम राबविण्याबाबतची पूर्व कल्पना पोलीस विभागाला दयावी. अतिक्र मण हटाव मोहिमेसाठी आवश्यक ते पोलीस बळ मागवून घ्यावे व पोलीस बंदोबस्तात अतिक्र मण हटविण्यात यावे, असे सांगितले. तसेच, घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेची निवड त्वरीत करण्यात यावी. शहरात कोणतीही व्यक्ती उघड्यावर शौचास बसणार नाही याची काळजी घ्यावी. गोंदिया हे शहर शौचमुक्त झाल्यामुळे शौचालयाचा प्रत्येक जण नियमीत वापर करतील यासाठी त्यांना उघड्यावरील शौचाचे दुष्परिणाम पटवून दयावे. शहरात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरु स्ती करु न ती नियमीत वापरात आणावी. गोंदियात बायोटॉयलेटचा वापर करता येईल का याकडे देखील नगर पालिकेने लक्ष दयावे, असे सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी, गोंदिया शहरातील अतिक्र मण हटाव मोहिम लवकरच सुरु करण्यात येईल. ज्यांचे अतिक्र मण तोडले जाणार आहे त्या अतिक्रमण धारकाकडून खर्चाचा पैसा वसूल करावा, असे सांगितले. नगराध्यक्ष इंगळे यांनी, शहरात ज्या-ज्या व्यक्तींनी अतिक्र मण केले आहे त्यांना ते अतिक्र मण काढण्याबाबतच्या नोटीस दिल्या आहेत. त्यांनी स्वत:हून केलेले अतिक्र मण काढावे अन्यथा अतिक्र मण मोहिमे दरम्यान ही अतिक्रमण काढण्यात येतील असे सांगीतले. दूषित पाण्यावर मजिप्राला निर्देश गोंदिया शहरातील काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे लक्षात आल्याचे सांगत नामदार बडोले यांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेवून ज्या भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे त्या भागातील पाईप लाईन दुरु स्तीचे काम तातडीने करावे. काही दिवसानंतर पावसाळा सुरु होणार आहे त्यामुळे जलजन्य आजारांची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नगर पालिकेने नाल्यांची वेळोवेळी सफाई करु न वाडी-वाडीतील कचरा वेळीच उचल करावा. अनेक भागात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे दुर्गंधी पसरली असून त्याची त्वरित सफाई करण्याचे निर्देश दिले.