शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या लोकगीतांचा निनाद आजही गुंजतो मनामनात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:34 IST

मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी : अनेक वर्षे निघून गेली, अनेक परंपरा जातात-येतात; पण बळीराजाचा पोळा हा सण मात्र प्रत्येकाच्या मनात ...

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी : अनेक वर्षे निघून गेली, अनेक परंपरा जातात-येतात; पण बळीराजाचा पोळा हा सण मात्र प्रत्येकाच्या मनात रुतलेला आहे. जगाचा पोशिंदा व त्याला इमानेइतबारे साथ देणारे ढवळ्या-पवळ्या बैल कष्टच करतात. या कष्टाची आठवण आजच्या दिवशी होतेच, म्हणून पोळ्याच्या अनेक लोकगीतांचा इतिहास साक्ष आहे. लोकगीतांचा निनाद आजही प्रत्येक मनामनात गुंजतो आहे.

अमावास्या श्रावणाची, आली घेऊन सणाला,

कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला ...

आला आला शेतकऱ्या, पोळाचा रे सन मोठा,

हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदुराले घोटा,

आतां बांधा रे तोरण, सजवा रे घरदार ...

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार..

अशा अनेक गीतांचा इतिहास आजही चालतच आहे.

पोळा हा दिवस बैलांचा विश्रांतीचा असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी-नाले व ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात व याला ‘खांदा शेकणे’ म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलांची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. असा हा मनाचा सुखसमाधानाचा पोळा सण.

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या आखरावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल-ताशे वाजवीत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ पोळ्याची लोकगीते म्हणायची पद्धत आहे. हीच परंपरा कायम आहे.

------------------------------

शोध संस्कृतीचे

शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. प्रथमत: ज्या संस्कृतींमध्ये बैलाचा शेतीसाठी वापर झाल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत त्या हडाप्पा व मोहेंजोदडो संस्कृतीत याचा उगम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संशोधकांनी याचा अधिकचा शोध घेणे आवश्यक आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून, हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

------------------------------बैलजोडी नसली तरी परंपरा जोपासली

काळ बदलत चालला असून, आताची शेती सुद्धा आधुनिक झाली आहे. यामुळेच बैलजोडीऐवजी आता मशीनचा वापर शेतीत होताना दिसत आहे. परिणामी बैलजोडींची संस्था कमी झाली तरी मात्र परंपरा तशीच कायम आहे. बैलपोळा भरला नाही; पण लोकांचा स्नेह सारखाच आहे. आदर राखत सणाच्या सुगीच्या परंपरा प्रत्येक नागरिक जोपासत आहे.