शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे विकासकामांना खीळ

By admin | Updated: April 16, 2017 00:47 IST

महाराष्ट्र शासनाची सिंचन विहिर, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व मामा तलाव दुरुस्ती कामांची धडक मोहीम सुरू आहे.

अभियंता पदोन्नतीचा घोळ : शासनाच्या धडक कार्यक्रमात बाधाअर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र शासनाची सिंचन विहिर, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व मामा तलाव दुरुस्ती कामांची धडक मोहीम सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. पदोन्नतीचा घोळ कायम आहे. हा प्रश्न जि.प.च्या सभेत चर्चेला आणणार असल्याची माहिती जि.प.चे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी दिली.प्राप्त माहितीनुसार, जि.प.अंतर्गत जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यात प्रत्येकी तीन अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात तर अभियंताच नाही. आमगावात एक अभियंता प्रतिनियुक्तीवर आहे. या रिक्त पदांमुळे शासनाच्या धडक कार्यक्रमात बाधा उत्पन्न होत आहे. आॅगस्ट २०१६ पासून कनिष्ठ अभियंता संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याबाबत जि.प.च्य सभांमध्ये अनेकदा हा विषय चर्चेला आला. मात्र अद्यापही पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला नाही.जि.प. लघू पाटबंधारे विभागात तब्बल १२ कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातून पदोन्नतीने कनिष्ठ अभियंत्यांची रिक्त असलेली पदे भरण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या आस्थापना शाखेकडे आहे.या विभागाला गेल्या ६ ते ८ महिन्यांत तीन कार्यकारी अभियंता लाभले. त्यामुळे आस्थापना शाखेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर कुणाचेही अंकुश नाही. पदोन्नतीसाठी फेब्रुवारी महिन्यात निवड समितीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी हे वर्धा जिल्ह्यात निवडणूक कार्यात व्यस्त असल्याने एप्रिल महिन्यात तारीख निश्चित करण्यात आली. मात्र अद्यापही पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला नाही. नस्तीमधील पदोन्नतीच्या नावात संबंधित लिपिकाद्वारे फेरबदल करण्यात येत असल्याची कुजबुज सुरू आहे.लघु पाटबंधारे ७, बांधकाम २ व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ५ अशी एकूण १४ रिक्त पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत. १२ पात्र कर्मचाऱ्यांची मूळ यदी असलेली नस्ती तयार करण्यात आली. मात्र एका कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्याने त्याचे नाव प्रलंबित ठेवण्यात आले आहे.पात्र ११ कर्मचाऱ्यांची यादी कार्यवृत्तात समाविष्ट आहे. मात्र यापैकी दोन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर डावलण्याचा बांधकाम विभागाच्या आस्थापना विभागाचा डाव आहे. हे दोन्ही कर्मचारी लघूृ पाटबंधारे विभागाचे आहेत. बिसेन यांचेकडे ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या २० मे १९९९ च्या शासन निर्णयानुसार अर्हता आहे. त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून व्यावसायीक परीक्षा देखील उत्तीर्ण आहेत. काळे यांनी २००८ मध्ये अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली. वयोमर्यादेनुसार २०१५ मध्ये त्यांना व्यावसायीक परीक्षेतून सुट आहे. हे असताना देखील हेतूपुरस्सर त्यांची नावे या यादीतून डावलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाचे नियम जिल्हा परषिदेला लागू नसतानाही त्या विभागाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन वरिष्ठांनी दिशाभूल केली जात आहे. मंजूर कार्यवृत्तावर पदोन्नती समिती सदस्यांच्या स्वाक्षरी झाल्या आहेत. मात्र पदोन्नती निवड समितीच्या कार्यवृत्तातील पाने बदलविण्याचा डाव सुरू आहे. या पदोन्नतीसाठी १ जानेवारी २०१६ ची सेवाज्येष्ठता यादी ग्राह्य धरण्याची गरज असताना यात आर्थिक लालसेपोटी पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)दोषींवर कारवाईची मागणी पदोन्नतीच्या या प्रकरणात आर्थिक लालसेपोटी पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नस्तीची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा चर्चेला येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते परशुरामकर यांनी दिली आहे.