शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 30, 2016 01:55 IST

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो.

शेतकरी चिंतेत : जास्त पावसामुळे उत्पादनावर परिणाम सालेकसा : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणून ओळखला जातो. थोडाफार येणे आणि गायब होणे या स्वरूपाचा तो असतो. परंतु यंदा सालेकसा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची दररोज हजेरी असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचा फटका बसण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. हलक्या प्रजातीचे धान ९० दिवसांपासून तर ११५ ते १२० दिवसांच्या कालावधीचे असतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या हलक्या धानाची मुदत संपली असून अनेक ठिकाणी हलका धान १०-१५ दिवसात कापणीसाठी सज्ज झालेला असेल. परंतु धान कापणी करण्यासाठी वातावरण अनुकूल असणे आवश्यक असते. जमिनीत ओलावा नसावा तसेच ऊन निघणे आवश्यक आहे. परंतु सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलेले आहे. तसेच सतत ढगाळ वातावरण असते. याचा वाईट परिणाम धान पिकावर पडू शकतो. धानपीक पूर्ण पिकल्यावर लोंब्याचे वजन वाढते आणि पाऊस वारा आला की उभे धानपीक खाली लोंबकळते. बांध्यात पाणी असल्यास सर्व पकलेले धान नष्ट होतात. सद्याची परिस्थिती बघता असे होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहे. त्याचबरोबर रोज पाऊस पडत असल्याने पकलेल्या पिकांमध्ये वजनदार दाणा (तांदूळ) बनण्यावरही वाईट परिणाम घेऊ शकतो. धानपीक कापणीच्या अवस्थेत आले तर त्याला कापून घेणे आवश्यक असते. जर कापणी केली नाही तर पकलेला धानाचा दाणा आपोआप झडून खाली पडण्याची शक्यता असते. भर पावसात धान कापणी शक्य नसून कशीबशी कापणी केली तर मळणीचा प्रश्न उभा होणार आहे. मळणीसाठी योग्य जागा मिळणार नाही तसेच स्वच्छ आणि निरभ्र आभाळ नसल्यास मळणीची कामे होऊ शकत नाही. दुसरा धोका असा की, ओलसर धानाचे कडप सडून त्याचे पुंजने ही बनवून ठेवता येत नाही. ठेवल्यास धानही खराब होतील आणि तणीस सुध्दा बनणार नाही. एकंदरीत हलक्या धानासाठी संकटाचा काळ सुरू झालेला दिसत आहे. मागील काही वर्षानंतर यंदा हलक्या धानाचे समाधानकारक पीक आलेले आहे. यंदा रोगाचा प्रभावसुध्दा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उत्पादन चांगले होणार असे वाटत असताना आता सतत पडत असलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस हलक्या सरींचा असून तो जास्त काळ पडत राहात नाही, परंतु यंदा या महिन्याभर पडत असून एक-दोन वेळा अतिवृष्टीचा फटका देणारा सुध्दा ठरला. त्यात काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आणखी किती पाऊस पडेल आणि किती नुकसान होईल याची चिंता लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)